नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीआधी कोणताही सर्वे करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले 400 पार तर निश्चितच आमचा पक्ष चारशे पार करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. TV9 नेटवर्कच्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये अमित शहा यांनी मुलाखतीमध्ये बोलतान हे मोठं विधान केलं आहे.
कोणत्याही सर्वेची गरज नाही. मोदी म्हणाले 400 पार तर आम्ही निश्चित 400 पार करणार आहे. पहिल्यांदाच देशातील लोक गुलामीतून मुक्त होत आहे. देशात नवी संसद झाली आहे. नव्या भारताची सुरुवात झाली असून अर्थव्यवस्था पाच नंबरवर आली. ‘मोदी थ्री’मध्ये आपण जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था होणार आहोत. मोदींना पुन्हा संधी द्या. देशाचं भलं इच्छिणार्या पक्षाला निवडा. मुलाची काळजी करणाऱ्या पक्षाला मतदान करून का. मतदान करताना छोटं देऊ नका, मोठं मतदान करा. मोदींनी मोठं काम केलंय 400 पार जागा द्या, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
मंदिर झालं नसतं तर राजकारण झालं असतं. कारण मंदिराची मागणी चालू राहिली असती आणि राजकारण झालं असतं. आता राम मंदिर झालं आहे. आम्ही विकासाच्या नावावर मतं मागत आहोत. या देशातील 60 कोटी गरिबांना काँग्रेसने 70 वर्ष सन्मान दिला नाही. दलित, आदिवासींना कधीच संवैधानिक अधिकार दिला नाही. आम्ही दहा कोटी घरात गॅस दिले. 14 कोटी घरात शौचालये दिले. ३कोटी लोकांना घरे दिले. 60कोटी लोकांना आरोग्याच्या खर्चातून मुक्त केलं. आम्ही त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवल्याचं अमित शाहा म्हणाले.