तिहारमधून सुटका झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज कुटुंबासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पोहोचले. त्यांच्यासोबत भगवंत मान आणि संजय सिंहही दिसले. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता तुरुंगवास पत्करला आहे. ईडी कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कालच ( 10 मे ) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन प्राप्त होताच केजरीवाल यानी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. तसेच त्यांनी नजिकचे शनि मंदिर आणि नवग्रह मंदिर गाठले. केजरीवाल यांच्या स्वागताची भव्य तयारी आपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल अनोखी भविष्यवाणी केली आहे.
मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांनी साल 2014 मध्ये भाजपात ज्याचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त होईल त्याला निवृत्त केले जाईल असा कायदा पक्षामध्ये मोदी यांनी बनविला होता असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. लालकृष्ण आडवाणी यांना आधी निवृत्त केले. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा यांना देखील निवृत्त केले आहे. आता मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. मी भाजपाला विचारू इच्छीत आहे की तुमचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण आहे ? जर भाजपाचे सरकार पुन्हा आले तर ते दोन महिन्यात योगीजी यांना निपटतील. त्यानंतर मोदी यांचे खास अमित शाह पंतप्रधान पदाच्या बोहल्यावर चढतील. मोदीजी स्वत:साठी नाही तर अमित शाह यांच्यासाठी मते मागत आहेत. मला पंतप्रधान पदाची आस नसल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना संपवायचे आहे. भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर तु्म्हाला मी अॅफीडेव्हीट वर लिहून देतो की थोड्याच दिवसात ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, स्टालिन यांना जेलमध्ये टाकले जाईल. यांनी भाजपाच्या नेत्यांना देखील सोडले नाही. ज्याच्या जीवावर मध्यप्रदेशात सत्ता आली त्या शिवराज सिंह चौहान यांना घालवले, वसुंधरा राजे, मनोहरलाल खट्टर यांचे राजकीय करीयर संपवले. हे जर जिंकले तर तर येत्या दोनच महिन्यात युपीचा मुख्यमंत्री बदलतील. ‘वन नेशन, वन लीडर’ म्हणजे देशात एकच नेता शिल्लक राहील अशी भविष्यवाणी केजरीवाल यांनी केली आहे.