नवी दिल्ली : संपूर्ण जगाला ज्या कोरोना विषाणूने ठप्प केलं होतं तोच विषाणू पुन्हा चीनमध्ये उद्रेक करू पाहत आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने भारतात त्याचा उद्रेक होऊ नये. याकरिता आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. वरिष्ठ पातळीवर ही चर्चा होणार असून यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची स्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतात आज काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार खबरदारी घेत असतांना चीन मधून येणारी विमानांबाबत आणि चीनच्या पर्यटकांबाबत आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. चीनवरुण आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्याचा निर्णय होण्याची शक्यता देखील आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
भारतात आज त्याच पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होण्यास सुरुवात होणार आहे, कोरोनासारखी गंभीर परिस्थिती वेशीवरच थोपवण्यासाठी आज केंद्रीच्या वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे.
चीनमधून येणारी प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय मास्क देखील बंधणकारक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतात दोन वर्षापूर्वी कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता, त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जीवघेण्या महामारीने संपूर्ण देश ठप्प झाला होता.
कोरोनापासून सुरक्षा मिळावी याकरिता भारतात लसही उपलब्ध झाली होती, त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना भारतात येऊ नये याकरिता आज केंद्रीय पातळीवर महत्वाची बैठक होणार आहे.