Video | मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं, कुत्र्यालाही नाही सोडलं, महिलेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल!

| Updated on: Apr 14, 2023 | 5:01 PM

मुख्यमंत्र्यांचं एक पोस्टर भिंतीवर लावलं होतं. गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्यानं ते पाहिलं. कुत्राच तो. खेळायला म्हणून घेतलं ते पोस्टर आणि फाडलं. पण या प्रकारावरून वेगळाच ड्रामा सुरु झाला आहे.

Video | मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं, कुत्र्यालाही नाही सोडलं, महिलेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली :  राजकारणात (Politics) आरोप प्रत्यारोप ,तक्रारी गुन्हे किती आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका किस्स्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांचं एक पोस्टर भिंतीवर लावलं होतं. गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्यानं ते पाहिलं. कुत्राच तो. खेळायला म्हणून घेतलं ते पोस्टर आणि फाडलं. पण या प्रकारावरून वेगळाच ड्रामा सुरु झाला आहे. एका महिलेने या कुत्र्याविरोधात थेट पोलिसातच धाव घेतली आहे. आंध्र प्रदेशातला हा किस्सा आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

काय घडलं नेमकं?

आंध्र प्रदेशातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एक कुत्रा भिंतीवर चिटकवलेलं पोस्टर फाडतोय. दाताने ओढतोय. या पोस्टरवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा फोटो छापलेला आहे. यावरून एका महिलेने आक्षेप घेतला आहे.

महिलेची पोलिसात धाव

कुत्र्याने भिंतीवरचं पोस्टर फाडलेलं पाहून एका महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. तेलुगु देशम पार्टीच्या महिला नेत्या दसारी उदयश्री यांनी विजयवाडा पोलीस ठाण्यात कुत्र्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कुत्र्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलेने केली आहे.

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

काही दिवसांपूर्वीच एक अहवाल समोर आलाय. देशातील मुख्यमंत्र्यांकडे किती पैसा आहे, कोण श्रीमंत आहे, यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे 510.38 कोटी रुपयांची सपत्ती आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रांवरून हा अहवाल सादर करण्यात आला होता. तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडे हे दुसऱ्या क्रमांकावरील श्रीमंत मुख्यमंत्री असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.त्यांच्याकडे 163.50 कोटी रुपयांची सपत्ती आहे.
तिसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. त्यांच्याकडे 63.87 कोटी रुपयांची सपत्ती आहे.