नवी दिल्लीः आंध्र प्रदेशचे बडे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या सभेदरम्याने जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याचं सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकूर येथे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची जाहीर सभा होती. यावेळी सभेत आलेले कामगार एकमेकांना भिडले.
वाद विकोपाला गेल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मात्र काही वेळातच चंद्राबाबू नायडू यांनी आपले भाषण थांबवले. चंद्राबाबू नायडू 28 ते 30 डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात नेल्लोर दौऱ्यावर आहेत.
Andhra Pradesh | Seven TDP workers lost their lives after a scuffle broke out between party workers during a public meeting being held by TDP leader N Chandrababu Naidu in Kandukuru of Nellore district today.
7 people have lost their lives, injured admitted to hospital: Police pic.twitter.com/uqU1j8K66X
— ANI (@ANI) December 28, 2022
ते बुधवारी कंदुकूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्या जाहीर सभेत टीडीपीचे कार्यकर्ते एकमेकांशी वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमुळे चेंगराचेंगरी होऊन 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मेळाव्यादरम्यान जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी चंद्राबाबूंनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एनटीआर ट्रस्टमार्फत शिक्षण देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या दुर्देवी घटनेनंतर पोलिसांनी असा दावा केला आहे की नेल्लोरमध्ये गर्दी आणि सार्वजनिक सभेदरम्यान कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर वादावादी वाढल्याने चेंगराचेंगरी झाल्याने या चेंगराचेंगरीत नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश भाजप-राज्य सरचिटणीस विष्णू वर्धन रेड्डी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त देताना म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील कंदुकुरू येथे टीडीपीच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारला आपत्कालीन-वैद्यकीय मदत देण्याची विनंती करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.