नवी दिल्ली: हरियाणा राज्य सरकारमधील मंत्री भाजप नेते अनिल विज (Anil Vij) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींनी देशाच्या जवानांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. राहुल गांधी यांना देशाच्या सीमांवर मायनस तापमानात तैनात करावे, अशी खोचक टीका अनिल विज यांनी केली. (Anil Vij slams Rahul Gandhi over comment on jawans)
अनिल विज यांनी टविट करुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “राहुल गांधी वारंवार देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तापमानात तैनात करावं. देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व गोष्टी समजतील”, असं अनिल विज म्हणाले.
राहुल गांधी सीमाओं की रक्षा करने के लिए बार – बार सेना का अपमान कर रहे हैं और बहुत सारा ज्ञान भी बांट रहे है । क्यों न राहुल गांधी को ही सीमा पर माइनस तापमान में खड़ा कर दिया जाए सीमापार के दुश्मन का मुकाबला करने के लिए राहुल गांधी को एक दिन में ही सारे ज्ञान का पता लग जायेगा ।
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) January 25, 2021
राहुल गांधी काय म्हणाले होते?
तामिळनाडूमध्ये एका रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधींनी देशातील सरकारनं शेतकरी आणि मजुरांचा विश्वास जिंकल्यास सीमांवर सैनिक तैनात करण्याची गरज नसल्याचं म्हटलं होते. ” जर भारतातील मजूर, शेतकरी, विणकर मजबूत आणि संरक्षित झाल्यास चीन भारताच्या भूभागात पाय ठेवण्याचं धाडस करणार नाही”, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री सही कह रहे हैं। कुछ लोग कभी नहीं सुधरेंगे। Video edit का खेल चालू आहे। पूरा वीडियो ये है ? https://t.co/ijNgv9RrVT pic.twitter.com/lf2CRkgujj
— Vinod Kapri (@vinodkapri) January 25, 2021
राहुल गांधींनी आणखी एक ट्विट करत “चीन भारतीय क्षेत्रात कब्जा करत आहे. मागील काही महिन्यांपासून ‘मिस्टर 56 इंच’ यांनी एकदाही चीन हा शब्द म्हटलेला नाही.”, असं टीकास्त्र राहुल गांधींनी सोडलं होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवे तीन कृषी कायदे भारतीय शेतीला उद्ध्वस्त करणारे आहेत. कृषी कायद्यांद्वारे भारतीय शेती दोन- तीन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न आहे,अशी टीका राहुल गांधींनी केली. पंतप्रधानांकडून शेतकरी, कामगार आणि देशातील छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी देश चालवला जात नसून काही उद्योगपतींसाठी चालवला जातो, असा आरोप राहुल गांधींनी केला. तामिळनाडूच्या नागरिकांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
संबंधित बातम्या:
नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांवर हल्ले, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल सुरुच
(Anil Vij slams Rahul Gandhi over comment on Jawans)