बिहार : ज्यावेळी घरात एखाद्या मुलीचा जन्म होतो. त्यावेळी त्या मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी आईवडिल लहान असल्यापासून नियोजन करीत असतात. असाचं एक प्रकार सध्या बिहार (Bihar) राज्यातील चंपारण्य (champaranya) भागात घडला आहे. चंपारण्य जिल्ह्यातील बगहामधील रामनगरमधील सुरेश गुप्ता हे चहाचं दुकान चालवत आपलं कुटुंबाचा गाडा चालवतात. त्यांची मुलगी सुध्दा चहाच्या दुकानात काम करीत होती. घरी गरिबी असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याचंबरोबर मुलीचं लग्न अशी जबाबदारी सुरेश गुप्ता (Bihar Public Service Commission) यांच्यावर होती. त्यामुळे ते पहिल्यापासून मेहनत करीत होते.
त्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्न तिच्या आईवडिलांनी लवकर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अंजली या तरुणीने लग्न करण्यास नकार दिला होता. कमी वयात लग्न करण्यास अंजलीने घरच्यांना प्रचंड विरोध केला होता. खूप वर्षे मेहनत केल्यानंतर बिहार लोक देवा आयोगाची परीक्षा अंजली पास झाली आहे. त्या परीक्षेत त्या तरुणीने अकवा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे तिचे सगळीकडे कौतुक करीत आहेत.
संपूर्ण रामनगरमध्ये त्या मुलीची चर्चा आहे. अंजली यांचे वडील रामनगर येथील आंबेडकर चौकात चहाची गाडी चालवतात. तिच्या वडीलांच्या चहाच्या गाड्यावर आता लोकं मिठाई घेऊन जात आहेत. त्याचबरोबर चहा विकणाऱ्या तिच्या वडिलांचं सुध्दा लोकं कौतुक करीत आहेत. घरची सगळी जबाबदारी असताना सुध्दा तिच्या वडिलांनी त्या मुलीला शिक्षण दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे.
गावच्या लोकांसाठी अंजली आदर्श
एका चहा विकणाऱ्याची मुलगी बिहार लोक सेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यामुळे संपूर्ण गावात मोठा आनंद साजरा केला जात आहे. त्या मुलीची सगळी लोकं कौतुक करीत आहेत. लोकांचं असं मत आहे की, अभ्यास कितीही कठीण असला तरी त्यामध्ये पास होता येतं. कठीण परिस्थिती सुध्दा अंजली परिक्षा पास झाल्यामुळे लोकांच्यासाठी ती आदर्श झाली आहे.