इस्लामाबाद | 08 ऑगस्ट 2023 : भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सीमा हैदर पाकिस्तानातून तिचा प्रियकर सचिन याला भेटायला भारतात आली आणि भारतातच आता राहतेय. यानंतर अंजू ही आपल्या प्रियकराला भेटायला पाकिस्तानात गेली आणि मी भेटून, एक लग्न सभारंभ आटोपून लगेच भारतात परत येईल असं म्हणत होती. पण ती आता वर्षभर तरी भारतात परतणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही पाकिस्तान सरकारने केलेली करामत असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे अंजूच्या वडिलांनी गाव सोडावं, असा दबाव त्यांच्यावर गावकऱ्यांकडून येत आहे. तर अंजूने तिकडे आपल्या प्रियकरासोबत निकाह केल्याचं देखील बोललं जात आहे. पण पाकिस्तान सरकारने अंजूचा मुक्काम पाकिस्तानात वाढवण्यासाठी तिला मदतच केलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अंजूचा टुरिस्ट व्हिसा हा संपणार होता, पण तो व्हिसा संपण्याआधीच, तिचा टुरिस्ट व्हिसा हा आणखी वाढवला आहे, हा काही महिनाभर नाही, तर तब्बल वर्षभरासाठी हा व्हिसा वाढवला आहे. यामुळे अंजूचा पाकिस्तानातील मुक्काम आणखी वर्षभर वाढणार आहे. यामुळे अंजूला पाकिस्तानी नागरिकत्न मिळण्यासंही मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंजू हिचा पाकिस्तान सरकारने व्हिसा १ वर्षासाठी वाढवल्याची माहिती खु्द्द तिचा पती नसरुल्लाह यानेच दिली आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची ही लव्ह स्टोरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात चर्चेचा विषय झालेला आहे.
नसरुल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नरसु्ल्लाह याने अंजूचा व्हिसा वर्षभर वाढवला असल्याचं पाकिस्तान मीडियासमोर म्हटलं आहे. यावेळी नसरुल्लाह याने अनेक रंजक दावे केले आहेत. यात सर्वात महत्त्वाचे असे आहे, पाकिस्तान सरकार आणि अधिकारी आम्हाला योग्य ती मदत करतायत, याआधी देखील भारतीय मीडियाशी बोलताना नरसुल्लाह याने ही कबुली दिली होती.
अंजू अखेर ४ ऑगस्ट रोजी भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यावर नरसुल्लाह म्हणतो, तिला भारतात कधी परतायचे आहे, हा तिचा प्रश्न आहे, तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती भारतात जावू शकते, पण तिथे तिच्या जीवाला धोका आहे, असा दावा तो करतोय. तिच्या घरच्यांना देखील त्रास दिला जात आहे, एवढंच नाही, तर अतिरेक्यांना शह देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या या पाकिस्तानच्या नागरिकाने म्हटलं आहे, की भारतात असे कसे लोकं राहतात.
“अंजूला पाकिस्तानी नागरिकत्व मिळालेलं नाही, मी यासाठी तिला इस्लामाबादला घेऊन गेलो होतो, तिला लवकरच पाकिस्तानचं नागरिकत्व मिळेल, अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे “, असं नरसुल्लाह याने पाकिस्तान मीडियाशी बोलताना म्हटलं आहे.
अंजूचा पती अरविंद याने भारतात स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल केला आहे, त्याने नसरुल्लाविरोधात ही केस दाखल केली आहे. याबाबत नसरुल्लाने असे सांगितले आहे की , त्याला जे करायचं आहे, त्याला ते करु दे,मी कशालाचं घाबरत नाही. तिचा पाकिस्तानमधील व्हिसा एका वर्ष वाढवला आहे. जर भारतातील लोकं अंजूला सुरक्षा देऊ शकत नसतील, तर ती भारतात येणार नाही, असा दावा नरसुल्लाह याने केला आहे.