नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया पाहता भारताने सर्व संबंध मोडून टाकले आहेत. असं असताना दोन्ही देशांमध्ये विचित्र प्रेम कहाणी गाजत आहेत. सीमा-सचिन या प्रेम प्रकरण शांत होत नाहीच तोच आता अंजू नसरुल्लाह यांची प्रेम कहाणी समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणात साम्य दिसून येत आहे. फरक फक्त इतकाच आहे की, सीमाने सचिनसोबत लग्न केलं आहे. तर अंजूने निकाह केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. पाकिस्तानातील मित्र नरसुल्लाह याला फक्त भेटण्यासाठी गेली असल्याची अंजूने सांगितले आहे. इतकंच काय तर भारतात परत येणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात काही काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इतकंच काय या प्रकरणामागे आयएसआयचा हात असल्याची आता चर्चा रंगली आहे.
भारतातून पाकिस्तानात अंजू आल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. मात्र तिच्याकडे अधिकृत विजा असल्याने पोलिसांनी तिला सोडून दिलं. सध्या अंजू तिचा मित्र नसरुल्लाहसोबत त्याच्या घरी राहात आहे. तसेच काही दिवसात घरी येणार असल्याचं सांगत आहे. अंजूचा विजा 21 ऑगस्टला संपणार आहे. पण अंजू 4 ऑगस्टला भारतात परतणार असल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तानात गेलेल्या अंजूने धर्म परिवर्तन केल्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अंजूच्या आसपास पाकिस्तानी पोलीस दिसत आहे. तसेच प्री वेडिंग शूट केल्याचंही समोर आलं आहे. पण सीमा हैदरचा भारतात येणं आणि त्यानंतर अंजूचं पाकिस्तानात जाणं एका षडयंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीमा हैदरच्या बातम्या झळकत असतानाच अंजू प्रकरण समोर आल्याने यामागे आयएसआयचं डोकं असल्याचं शक्यता वर्तवली जात आहे.
अंजू आणि नसरुल्लाह यांची ओळख सोशल मीडियावर 2019 साली झाली होती. अंजू गेल्या एक वर्षापासून पाकिस्तानात जाण्यासाठी वीजा मागत होती. 21 जुलैला पाकिस्तान एंबेसी वीजा देते आणि अंजू पाकिस्तानात जाते.
अंजू पाकिस्तानात जाणार हे तिच्या पतीला माहिती नव्हतं. तसेच ती बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात नोंदवली नव्हती. मग ही बातमी पाकिस्तान मीडियाला कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर ती पाकिस्तानात असल्याचं सांगण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ जारी कसा झाला? तसेच ती भारतात येणार असल्याचं सांगत आहे.
एकीकडे, सीमाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तर सीमाबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.आधी इस्लाम धर्म स्वीकारून निकाह केल्याचं समोर आलं. त्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला नसल्याचं सांगितलं गेलं. वारंवार संभ्रम निर्माण केला जात असल्याचं दिसत आहे.
पाकिस्तानात गेलेली 35 वर्षीय अंजू राजस्थानच्या भिवाडी येथे एका ऑटोमोबाईल कंपनीत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करते. तिचं लग्न अरविंदसोबत झालं असून त्याना 15 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी आहे. अंजू आणि नरसुल्लाह यांची मैत्री फेसबुकवर 2020 साली झाली होती. त्यानंतर एकमेकांना नंबर दिला आणि व्हॉट्सअॅपवर बोलणं सुरु झालं.
उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये राहणाऱ्या अंजूने धर्मपरिवर्तन करून ख्रिश्चन धर्म स्वीकारून अरविंदशी विवाह केला होता.नवऱ्यासोबत चांगले संबंध नाहीत. नाईलाजाने मी पतीसोबत राहात होती. मुलांच्या शिक्षणासाठी मी जॉब करत होती आणि त्यांच्यासोबत राहात होती. पण मी सध्या इथे फिरायला आली आहे. परतल्यानंतर मी मुलांसोबत वेगळी राहणार असल्याचंही चर्चा आहे.