Diwali Holiday in New York : दिवाळीत न्यूयॉर्कमधील शाळांनाही राहणार सुट्टी, महापौरांची घोषणा

| Updated on: Jun 27, 2023 | 4:04 PM

न्यूयॉर्कसह पूर्ण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. दिवाळी त्यांचा सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीत अमेरिकेतील शाळांत सुटीसाठी कायदा तयार केला गेला पाहिजे.

Diwali Holiday in New York : दिवाळीत न्यूयॉर्कमधील शाळांनाही राहणार सुट्टी, महापौरांची घोषणा
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्कमधील शाळांना आता दिवाळीत सुटी राहणार आहे. न्यूयार्क सिटीचे महापौर एरीक एडम्स यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. एडम्स म्हणाले, दिवाळीला न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुटी राहील. विद्यार्थ्यांना दिवाळीत सुटी मिळावी, यासाठी विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार आणि भारतीय समुदायांनी संघर्ष केला.

दिवाळीतील सुटीसंबंधी विधेयक पारित

जेनिफर या न्यूयॉर्क स्टेटच्या प्रतिनिधी सभेसाठी निवड झालेल्या पहिल्या भारतीय-अमेरिकी महिला आहेत. त्या म्हणाल्या, न्यूयॉर्क सिटी पब्लिक स्कूलमध्ये दिवाळीत सुटीसंबंधी विधेयक पारित करण्यात आले आहे. यंदापासून दिवाळीत न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुटी असेल.

हे सुद्धा वाचा

यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळी

जेनिफर म्हणाल्या, न्यूयॉर्कसह पूर्ण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. दिवाळी त्यांचा सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीत अमेरिकेतील शाळांत सुटीसाठी कायदा तयार केला गेला पाहिजे. यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. २०२४ मध्ये न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदा दिवाळीत सुटी असेल.

अमेरिकी संसदेत दिवाळीच्या सुटीचे विधेयक सादर

गेल्या महिन्यात अमेरिकी संसदेत दिवाळीत सुटी मिळावी म्हणून विधेयक सादर करण्यात आले. अमेरिकेतील खासदार ग्रेस मेंग यांनी यूएस काँग्रेसमध्ये विधेयक सादर केले. दिवाळीत संपूर्ण अमेरिकेत सुटी जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण. नोकरी, व्यवसायानिमित्त बरेच लोकं अमेरिकेत गेले. तिथं दिवाळी साजरी केली जाते. पण, अमेरिकन सरकार दिवाळीला सार्वजनिक सुटी देत नाही. दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुटी मिळावी, अशी भारतीय-अमेरिकन लोकांची मागणी आहे.

न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीला यंदा सुटी मिळणार आहे. असाच कायदा संपूर्ण अमेरिकेत करावी, असं भारतीय-अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे. यासंबंधीचे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आले आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.