भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दसरा सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगाल येथील सुकन्या सैन्य तळावर पारंपारिक पद्धतीने शस्रास्रांची विधीवत पूजा केली. या दरम्यान त्यांनी शस्रास्र पूजे संबंधी अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या. भारत जरी शांतताप्रिय देश असला तरी गरज पडल्यास या शस्रास्रांचा वापर करीत आला आहे. संरक्षण मंत्र्यांनी कलश पूजेने या शस्रास्रांच्या पूजेची सुरुवात केली. त्यानंतर सैन्यांच्या मशिन गन आणि वाहनांची पूजा केली. त्यांनी अत्याधुनिक पायदळ, तोफखाना, आणि संचार वाहने, ड्रोन यांची देखील पूजा केली.
या प्रसंगी राजनाथ सिंह यांनी आमच्या हिताला काही धोका निर्माण होतो. तेव्हा आम्ही कोणतेही मोठे पाऊल उचलायला संकोच करत नाही. शस्रपूजा म्हणजे स्पष्ट संकेत आहे की गरज पडेल तेव्हा या हत्यारे आणि उपकरणांचा संपूर्ण ताकदीने वापर केला जाईल.राजनाथ सिंह यांनी सांगितले की शक्ती, यश, संरक्षणासाठी आशीवार्द मागण्यासाठी केल्या जाणाऱ्या दसरा सोहळ्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व मोठे आहे. या संरक्षण हत्यार प्रणालीच्या महत्व मोठे आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी संरक्षण प्रणाली इतर शस्रास्रांत वाढ करण्यावर आमच्या सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला थळ सेनाध्यक्ष जनरल उपेन्द्र द्विवेदी, संरक्षण सचिव आर.के. सिंह,इस्टर्न कमांडचे जनरल ऑफीस कमांडिंग-इन-चीफ लेफ्टिनंट जनरल राम चंद्र तिवारी, बोर्डर रोडचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन, त्रिशक्ति कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टिनंट जनरल जुबिन ए. मिनवाला आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.