नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (AAP Leader Arvind Kejriwal) यांनी बुधवारी भाजपवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल चढवला. पंजाबमधील आपच्या 10 आमदारांना 25 कोटींची (25 crores) ऑफर देऊन आमदाराना विकत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) केला जात असल्याचा आरोप केला गेला आहे. भाजपमुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचेही त्यांनी सांगत जनतेचा पैसा भाजप आमदार खरेदी करण्यासाठी वापरत असल्याचे म्हटले आहे.
भाजपवर निशाणा साधताना अरविंद केजरीवालांनी सांगितले की, आम्हाला मंगळवारीच या गोष्टीची माहिती मिळाली होती, आपच्या 10 आमदारांना 25-25 कोटी देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंजाबमधील आपच्या दहा आमदारांबरोबर भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर त्यांना पैशाचे अमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यानंतर या घटनेबाबत आपकडून पत्रकार परिषदेतही खुलासा करण्यात आला.
अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की, भाजपकडून आमदार खरेदी करण्याचं जो प्रकार चालू आहे, त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपवर निशाणा साधताना अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाजपकडून वेगवेगळ्या राज्यात ऑपरेशन लोटस चालू आहे. किंवा ईडी, सीबीआयची भीतीही आमदारांना घातली जात असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला गेला आहे.
आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, आमदार खरेदी करण्यासाठी भाजपकडून नागरिकांचा पैसा वापरला जात आहे. त्यामुळेच देशाता महागाई वाढत आहे.
गोव्यात काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधत याबाबतीत काँग्रेस पक्ष अपयशी ठरला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.