पाकचे माजी मंत्री चौधरी फवाद यांच्या पोस्टला अरविंद केजरीवाल यांचे तडफदार उत्तर, पाहा काय म्हणाले

| Updated on: May 25, 2024 | 4:23 PM

देशात लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान आज झाले. आज केजरीवाल यांनी सहकुटुंब दिल्लीत मतदान केले. आपल्या कुटुंबाचा फोटो केजरीवाल यांनी सोशल मिडीयावर शेअर केला, त्यात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्याला पाकचे माजी मंत्री फवाद यांनी उत्तर दिले. त्याला केजरीवाल यांनी उत्तर दिले...

पाकचे माजी मंत्री चौधरी फवाद यांच्या पोस्टला अरविंद केजरीवाल यांचे तडफदार उत्तर, पाहा काय म्हणाले
delhi cm Arvind Kejriwal casting vote today in Delhi with his family
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा निवडणूकांच्या मतदानाचा सहावा टप्प्यांतर्गत अनेक राज्यांसह दिल्लीत आज लोकसभेच्या सात जागांवर मतदान होत आहे. या जागांपैकी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदान केले. त्यानंतर त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. त्याला पाकिस्तानचे माजी मंत्री आणि इमरान खान यांच्या पक्षाचे नेते चौधरी फवाद हुसैन यांनी ही पोस्ट रिट्वीट करीत आपले मत मांडले. त्याला दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्वरीत उत्तर दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर अटक केल्याने राजकारण तापले होते. केजरीवाल खमके निघाले, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा न देता आपण तिहारमधून कारभार चालवू असा उलट भाजपालाच जमालगोटा दिला. अखेर केजरीवाल यांच्या पत्नीने दिल्लीतील आपच्या निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली. केजरीवाल यांनी आपल्याला बजरंग बलीच्या कृपेने जामीन मिळाल्याचे वक्तव्य अंतरिम जामीनावर सुटका झाल्यावर केल्याने ते चांगलेच चर्चेत आले. आज केजरीवाल यांनी सहकुटुंब दिल्लीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला.

केजरीवाल यांनी व्होट केल्यानंतर लागलीच सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. त्या ते म्हणाले की, ‘आपण वडील, पत्नी आणि मुलांसह आज मतदान केले. ‘माझ्या आईची तब्येत बरी नाही. ती खूपच आजारी आहे. त्यामुळे ती आली नाही. मी हुकुमशाही, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात मतदान केले आहे. तुम्ही देखील मतदान करा ‘ असे ( आधीचे ट्वीटर )  एक्सवर अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. या पोस्टला रिट्वीट करीत फवाद चौधरी यांनी लिहीले की आशा आहे की शांती आणि सौहार्द द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करू शकेल असे त्यांनी म्हटले. यावर पलटवार करीत केजरीवाल यांनी लागलीच उत्तर दिले की, ‘चौधरी साहेब, मी आणि माझा देश आमच्या समस्या सांभाळण्यास संपूर्णपणे सक्षम आहोत. यावेळी पाकिस्तानची हालत खराब आहे. आपल्या देशाला सांभाळा.’

फवाद यांची पोस्ट –

केंद्रीय मंत्री रिजीजू यांचा वार

फवाद चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी लागलीच म्हटले की मी आधीच सांगितले होते की केवळ राहुल गांधीच नाही तर अरविंद केजरीवाल यांनाही पाकिस्तानात खूप पाठिंबा आहे. फवाद चौधरी यांनी पहिल्यांदा असे वक्तव्य केले नसून त्यांनी याआधी राहुल गांधी यांचे गुणगान गाणारा व्हीडीओ शेअर करीत लिहीले होते की ‘राहुल गांधी ऑन फायर’ यावरुन भाजपाने कॉंग्रेसवर खूप हल्लाबोल केला होता. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देखील भाषणात याचा उल्लेख केला होता.

केजरीवाल यांचे उत्तर –