नवी दिल्लीः नुकताच झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गुजरातमध्ये मुस्लिम (Gujrat Muslim) तरुणांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यावर घटनेवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मत व्यक्त करताना गुजरात राज्य सरकारवर टीका करत असतानाच त्यांनी भाजपवरही (BJP) निशाणा साधला. गुजरातमधील गरबा (Garba) कार्यक्रमात दगडफेक करणाऱ्या काही मुस्लिमांना पोलिसांनी मारहाण केली होती, त्या घटनेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारतात भटक्या कुत्र्यांना किंमत आहे, मान सन्मान आहे मात्र देशातील मुस्लिमांना किंमत नसल्याची खदखद त्यांनी व्यक्त करुन दाखवली आहे.
या घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, देशात जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्या त्या ठिकाणी मुस्लिम समाज तुरुंगातील कैद्याप्रमाणे जिणं जगत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
देशात मुस्लिमांपेक्षा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचा मान दिला जाता मात्र मुस्लिमांना दुजेभावाची वागणूक दिली जाते. एकीकडे हे प्रकार सुरु असतात तर दुसरीकडे धार्मिक मुद्यावरुन मदरसेही पाडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त गरबा कार्यक्रम चालू असताना जमावावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुजरात पोलिसांनी मुस्लिम समाजातील लोकांना ताब्यात घेतले.
एवढेच नाही तर काही लोकांना खांबाना बांधून 300 ते 400 लोकांसमोर बेदम मारहाणही केली गेली आहे.
तर ज्या मुस्लिम तरुणांना मारहाण केली जात होती, त्यावेळी काही लोकांकडून जोरदार घोषणाबाजीही केली गेली आहे. त्याकडे गुजरातमधील राज्य सरकाने दुर्लक्ष केले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातही उंडेलामध्ये नवरात्रोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या गरबा नृत्याच्या कार्यक्रमप्रसंगी मुस्लिम समाजातील काही लोकांनी दगडफेक केली होती. त्यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत.
मशिदीजवळ आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे उंढेला गावच्या सरपंचाने जवळच असलेल्या मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यानंतर कार्यक्रमावर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेऊन अटक केली. मात्र त्यामध्ये फक्त केवळ तिघा जणांच्या रिमांडची मागणी केली गेली.
हल्ल्यानंतर पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले होते, त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तीन संशयित आरोपींना खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचे त्यामध्ये दिसत आहे.
पोलिसांनी ज्या वाहनातून तिघांना आणून खांबाचा आधार घेऊन संशयित आरोपीच्या हाताला पकडून त्याला बेदम मारहाण केली जात आहे.
तर दुसरा पोलीसही काठीने बेदम मारहाण करत.त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.