आसाराम बापूला सशर्त जामीन, लवकरच तुरुंगाबाहेर, बलात्कार प्रकरणात जन्मठेप

| Updated on: Jan 07, 2025 | 2:11 PM

Asaram gets bail from Supreme Court : बलात्काराच्या प्रकरणात अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने आसारामला सशर्त जामीन मंजूर केला. या कालावधीत ते शिष्य, अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत.

आसाराम बापूला सशर्त जामीन, लवकरच तुरुंगाबाहेर, बलात्कार प्रकरणात जन्मठेप
आसारामला सशर्त जामीन
Follow us on

बलात्कारच्या एका प्रकरणात अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला जामीन मिळाला. 2013 मधील एका बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील स्थानिक न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून आसाराम तुरूंगात आहेत. वैद्यकीय पार्श्वभूमीवर आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे. अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्ती लावल्या आहेत. या कालावधीत ते शिष्य, अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत.

मेडिकल ग्राऊंडवर जामीन

न्यायालयाने आसाराम बापूला मेडिकल ग्राऊंडवर जामीन मंजूर केला. पुरावे मिटवण्याचा अथवा त्यांच्याशी छेडछाड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना दिले. या कालावधीत ते शिष्य, अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत. अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने या अटी आणि शर्ती लावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

आसारामवर तुरूंगात उपचार

आसारामवर सध्या तुरुंगात उपचार सुरू आहेत. तुरूंगातील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांना हृदयरोग आहे. यापूर्वी बापूला हृद्य विकाराचा झटका बसला आहे. यापूर्वी सुद्धा त्यांना न्यायालयाने मेडिकल ग्राऊंडवर बापूला जामीन मंजूर केला होता.

शिक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळली

जामीन मिळावा यासाठी आसाराम बापूकडून अनेकदा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी अर्ज दाखल केला असता, केवळ वैद्यकीय कारणाबाबतच विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कारणांचा विचार केल्या जाणार नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. शिक्षा कमी करण्यासाठी आसारामने विनंती केली होती. पण ही याचिका गुन्ह्याची गंभीरता पाहता टिकली नाही. न्यायालयाने याचिका नामंजूर केली होती. तर आज कोर्टाने आसारामला सशर्त जामीन मंजूर केला.

मुलगा पण तुरूंगात

प्रकरणातील पीडितेच्या बहिणीने आसारामचा मुलगा नारायण साईविरोधात बलात्काराची तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणात नारायण साईला एप्रिल 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसारामला ज्याप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली, त्याचा गुन्हा 2013 मध्ये नोंदवण्यात आला आहे. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या नारायण साई हा तुरुंगात आहे.