दिसपूर : आसाममध्ये एका खासगी गाडीत EVM मशीन मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करत 4 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. याप्रकरणात निवडणूक आयोगाने सांगितलं की, अधिकाऱ्यांनी एका कारमध्ये लिफ्ट घेतली होती. त्यानंतर या कारची ओळख पटवली असता कारचा मालक भाजपचा उमेदवार निघाला. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने कडक पाऊल उचलले आहे.(4 officers suspended after receiving EVM machine in private car)
तपास केल्यानंतर कारमध्ये EVM मशीनसह BU, CU आणि VVPAT मशीनही आढळले आहेत. दरम्यान, EVM मशीलसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. सीलबंद अवस्थेत ती मिळून आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यानंतर ही मशीन स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात आली आहे. एक मतदान अधिकारी काल गायब झाला होता. त्याचाही तपास घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उशिर झाल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलं.
निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणात पीठासीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तर परिवहन प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्या प्रकरणी एक PO आणि अन्य 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. EVM मशीन मात्र सीलबंद अवस्थेत मिळून आली आहे. असं असलं तरी इंदिरा एमव्ही स्कूल पोलिंग बूथवर पुन्हा एकदा मतदान घेतलं जाणार आहे. स्पेशल ऑब्जर्व्हरकडूनही या बाबत अहवाल मागवण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार NH8 हा एकमेव असा रस्ता आहे जो करीमगंजपर्यंत जोडलेला आहे. 6 वाजता मतदान पूर्ण झालं. सर्व गाड्या पोलिंग बूथवरुन करीमगंजला परतत होत्या. 9 वाजता पोलिंग पार्टीला घेऊन परतणारी गाडी खराब झाली. ट्राफिकमुळे ही गाडी आपल्या ताफ्यातून बाजूला झाली. पोलिस पार्टीच्या लोकांनी सेक्टर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि स्वत: एक गाडीची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन ते वेळेवर पोहोचतली.
रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी पोलिंग पार्टीतील लोक दुसऱ्या गाडीत बसले. पुझे लोकांनी त्यांना अडवलं आणि दगडफेक केली. नंतर माहिती मिळाली की दुसरी गाडी भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल यांची होती. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी लोकांनी ती गाडी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. यावेळी EVM मशीनसोबत छेडछाड करण्यात येत होती. 10 वाजेच्या आसपास SP करीमगंज घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षकांनी हवेत गोळीबार करुन लोकांना बाजूला केलं. त्यानंतर EVM मशीन ताब्यात घेण्यात आलं.
1.Last night a polled EVM machine was being taken in Patharkandi Vidhan Sabha, Assam when a crowd intercepted it as car didn’t belong to EC. As per sources, EC car had broken down & officials took a lift in a passing car that was later identified as belonging to a BJP candidate.
— ANI (@ANI) April 2, 2021
इतर बातम्या :
‘निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला’
4 officers suspended after receiving EVM machine in private car