नवी दिल्लीः आसामाचे खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आज एक धक्कादायक विधान केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदूंची लोकसंख्या वाढविण्यासाठी मुस्लिमांचा फॉर्म्यूला वापरा आणि हिंदू मुलींची 18 ते 20 व्या वर्षीच त्यांचा विवाह केला पाहिजे असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. हिंदू समाजाबद्दल बोलताना खासदार अजमल म्हणाले की, हिंदूंची एक समस्या आहे. ती म्हणजे हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांच्या वेगाने वाढत नाही. त्याची त्यांनी कारणं सांगितली.
ते म्हणाले की, हिंदू माणसं योग्य वयात लग्न करत नाहीत. आणि घराबाहेर मात्र दोन-दोन, तीन-तीन प्रेमप्रकरण करत असताता.
वय झालं तरी ते लग्न करत नाहीत, आणि लग्न केलं तर मात्र ते 40 व्या वर्षी लग्न करतात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढत नाही असं धक्कादायक विधान केले आहे.
लोकसंख्या वाढीची समस्या प्रचंड असतानाच बदरुद्दीन अजमल यांचे हे विधान प्रचंड गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
खासदार बदरुद्दीन अजमल यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मात्र भाजपने त्यांना ही असली विधानं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. हिंदूंच्या विवाहाबाबतही त्यांनी धक्कादायक आणि खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहे.
हिंदूंवर टीका करताना ते म्हणतात की, हिंदूं लोकं लग्न करतात मात्र ती कुटुंबाच्या दबावामुळे लग्न करतात, त्यामुळे मग मुलं जन्माला कशी येणार असंही विधान त्यांनी केले आहे.
हिंदूंवर ही टीका करत असतानाच त्यांनी मुस्लिम समाजात मात्र मुलीचं लग्न 18 व्या वर्षीच करतात असंही त्यांनी सांगितले आहे.
मुस्लिम समाजातील लग्नाबाबत बोलताना त्यांनी भारत सरकार आमच्या समाजात मुलींच्या लग्नास 18 व्या वर्षी मान्यता देतं तर मुलांच्या लग्नास 22 वर्षी मान्यता देते. त्यामुळे आमच्या समाजाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हिंदूनीही मुस्लिम समाजाचा लग्नाचा फॉर्म्यूला वापरवा असा सल्ला दिला आहे.
लग्नाबाबत मुस्लिम समाजाचा फॉर्म्यूला वापरावा आणि आपल्या मुलींची लग्न 18 व्या करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मुलींबद्दल बोलताना त्यांनी जमिनीचा दाखला देत म्हटले आहे की, शेती नापीक जमिनीवर केली जात नाही तर ती सुपीक जमिनीवर केली जाते असे खालच्या पातळीवर जात त्यांनी वक्तव्य केले आहे.
खासदार अजमल यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपच्या आमदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, हिंदू बद्दल अशी वक्तव्य केली गेली तर ती आम्ही खपवून घेणार नाही.
आणि अशी वक्तव्य करायची असतील तर तु्म्ही बांगलादेशात जा आणि तिथे तुमचे ज्ञान पाजळा असा इशाराही त्यांनी दिला आहे. आणि आम्हाला मुस्लिमांकडूनही काहीही शिकण्याची गरजही नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.