मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2022) रणधुमाळी आता संपत आलीय. उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात मतदान बाकी आहे. अशावेळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेशात भाजप सरकार बनवणार असल्याचा दावा केलाय. तर पंजाबमध्ये भाजपची स्थिती अधिक चांगली होईल. पंजाबमध्ये भाजपनं युतीतील मोठा पक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे, असंही शाह यांनी म्हटलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, उत्तर प्रदेशात योगी सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला. राज्यातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यात 30 ते 70 टक्के घट झालीय. सर्व माफिया सध्या तुरुंगात आहेत. महिला आणि मुली आता उत्तर प्रदेशात सुरक्षित आहेत. त्याचबरोबर बूथ स्तरापासून पंतप्रधान मोदी आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते एक लय, एक गती आणि एक दिशेनं वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क ठेवतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या निवडणूक एका नव्या आणि विचित्र प्रकारची प्रचार मोहीम पाहायला मिळाली. देशात जवळपास साडे सात वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार आहे, असंही शाह यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय.
बूथ स्तर से लेकर प्रधानमंत्री जी और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी तक सभी कार्यकर्ता एक ही लय और गति के साथ एक ही दिशा में अलग अलग माध्यम से जनसंपर्क करते हैं।
आजाद भारत के इतिहास में इस चुनाव में एक थोड़े नए और विचित्र प्रकार का प्रचार अभियान रहा।
– श्री @AmitShah pic.twitter.com/MSAI7tM910
— BJP (@BJP4India) March 5, 2022
पाच राज्यांच्या निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता स्वतंत्र भारतातील कोणत्याही पंतप्रधानांच्या लोकप्रियतेपेक्षा अधिक दिसून आली. याचा फायदा भाजपला या निवडणुकीत होईल. मोदी हे स्वत: उत्तर प्रदेशातून खासदार आहेत. काशीमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला, तेव्हा जनता आपल्यासाठी काम करणाऱ्या नेत्याचं कशाप्रकारे स्वागत करते, याचं उत्तम उदाहरण आपल्याला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं, असा दावाही अमित शाह यांनी केलाय.
इन पांचों राज्यों में नरेन्द्र मोदी जी की लोकप्रियता आजाद भारत के किसी भी प्रधानमंत्री की लोकप्रियता से कहीं अधिक ऊपर दिखाई पड़ी और इसका सीधा फायदा भाजपा को इस चुनाव में हो रहा है।
– श्री @AmitShah
— BJP (@BJP4India) March 5, 2022
‘उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच लोकशाहीचं खरं चित्र पाहायला मिळालं. जातीवाद, परिवारवाद, तुष्टीकरण या तिन्ही गोष्टी संपवत आज आपण उत्तर प्रदेशात लोकशाही नांदताना पाहतोय. उत्तराखंडमध्ये पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. वन रँक वन पेन्शन योजनेतून उत्तराखंडमधील सर्व रिटायर्ड सैनिकांना लाभ झाला’, असंही शाह यावेळी म्हणाले.
उत्तराखंड में एक भी भ्रष्टाचार के आरोप के बगैर पूरे पांच साल भाजपा की सरकार चली है।
वन रैंक-वन पेंशन की उपलब्धि उत्तराखंड के रिटायर्ड सैनिकों के घर-घर तक पहुंची है।
– श्री @AmitShah pic.twitter.com/VgIyd03JEs
— BJP (@BJP4India) March 5, 2022
Joint press conference by BJP National President Shri @JPNadda and HM Shri @AmitShah at party headquarters in New Delhi. https://t.co/YPzy8HLo6m
— BJP (@BJP4India) March 5, 2022
इतर बातम्या :