कल्याण : लहान भावाने भांडणात मध्यस्थी केली याचा राग मनात ठेवून काही तरुणांनी मोठ्या भावावर हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. जखमी तरुणावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. विशाल भालेराव असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर प्रतिक ठाकरे आणि विकास शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याणच्या आधारवाडी परिसरात राहणारे काही तरुण एका ढाब्यावर बसले होते. या दरम्यान विजय शिंदे आणि त्याचा मित्राचा बंटी नावाच्या एका तरुणासोबत काही कारणावरुन वाद झाला. वाद सुरु असताना या ठिकाणी असलेल्या अक्षय भालेराव या तरुणाने मध्यस्थी करीत भांडण सोडविले. दोन्ही गटांना घरी जाण्यास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन विजय शिंदे, विकास शिंदे, हर्षद पाटील, प्रतिक ठाकरे आणि एक बोरगावकर नावाचा तरुण पुन्हा अक्षयच्या शोधात आले. दुसऱ्या दिवशी अक्षयला एका ठिकाणी भेटले.
विजय शिंदे यांने अक्षयला भांडणात मध्यस्थी केल्याबद्दल जाब विचारला. जास्त शहाणपणा करीत होता. आता कोणाला बोलवायचे ते बोलव. आम्ही तुला सोडणार नाही, असे बोलत सर्वांनी अक्षयला घेरले. अक्षयने लगेच त्याचा मोठा भाऊ विशाल याला फोन केला. विशाल त्याठिकाणी आला. विशालने सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेला विजय शिंदे आणि त्याच्या मित्रंनी विशालवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यात विशाल गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, विशाल भालेराव याच्यावर हल्ला करणाऱ्या विजय शिंदे, विकास शिंदे, हर्षद पाटील, प्रतिक ठाकरे आणि बोरगाव नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विकास शिंदे आणि प्रतिक ठाकरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल. (Attack on elder brother who went to rescue younger brother in Kalyan)
इतर बातम्या