देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून जिचा गवगवा केला जातो, ती वंदेभारत एक्सप्रेस सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. देशातील अनेक शहरात 100 वंदेभारत एक्सप्रेस सध्या धावत आहेत. या ट्रेन आरामदायी आणि वेगवान आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळात बचत होत आहे. शिवाय या ट्रेन वीजेवर धावत असून त्यांना स्वतंत्रपणे इंजिन जोडण्याची गरज लागत नाही. या वंदेभारतच्या आता पर्यंतच्या सर्व वंदेभारत एक्सप्रेस या दरताशी 160 ते 180 किमी वेगाने धावत असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रेन बहुतांशी पर्यटन तसेच धार्मिक पर्यटना मार्गावर चालविण्यात येत आहेत. परंतू वेग हाच या ट्रेनचा युएसपी असताना आता ही ट्रेन वेगाच्या बाबतीत जरा धीमी झाल्याचे उघडकीस आले आहे.
वंदेभारत एक्सप्रेसच्या वेगाबाबतीत एक नवीनच माहीती समोर आली आहे. वंदेभारत एक्सप्रेसचा सरासरी वेग 2020-21 मध्ये प्रति तास 84.48 किमी होता.साल 2023-24 वंदेभारतचा सरासरी वेग कमी होऊन प्रति तास 76.25 किमी वेगाने ती सध्या धावत आहे अशी माहीती रेल्वे प्रशासनाने आरटीआयमध्ये दिले आहे. वंदेभारत बरोबर अन्य ट्रेनच्या वेगावर देखील परिणाम झाला आहे. ज्या ट्रेनच्या मार्गांदरम्यान पायाभूत कामे सुरु आहेत. अशा ट्रेनच्या वेगावर देखील परिणाम सुरु झाला आहे.काही ठिकाणी भौगोलिक कारणांनी तसेच वातावरणाचाही गाड्यांच्या वेगावर परिणाम झाला आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेसचे उदाहरण यासाठी देण्यात आले आहे. कोकणातील मार्ग हा घाटातून जात आहे. या परिसर संवेदनशील आहे. येथे ट्रेनच्या वेगाबरोबर सुरक्षेसाठी कमी वेगाने गाड्या चालवाव्या लागतात असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. विशेषत: मान्सूनमध्ये येथे खूपच काळजी घ्यावी लागते. यावेळी वंदेभारतच्या वेग प्रति तास 75 किमी इतकी ठेवावी लागते. मध्य प्रदेशातील चंद्र शेखर गौड नावाच्या व्यक्तीने आरटीआय अर्जाद्वार वंदेभारत ट्रेनच्या वेगाची माहीती मागितली होती.
सध्या वंदेभारत एक्सप्रेस या चेअरकार स्वरुपाच्या असून आता वंदेभारतचा स्लिपर कोच तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या वंदेभारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटो टाईप लवकरच प्रवाशांच्या भेटीला येत आहे. नवी दिल्ली ते मुंबई मार्गावर स्लीपर वंदेभारत चालविण्याची योजना आहे. बंगलोरची बीईएमल ( BEML Limited ) आधीची भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (Bharat Earth Movers Limited ) कंपनी वंदेभारत स्लिपर कोच तयार करीत आहे.