राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेतील मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन; महाराष्ट्राशी होतं खास नातं

| Updated on: Jun 22, 2024 | 12:52 PM

Ayodhya News : अयोध्येतील मंदिरातील राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. 22 जानेवारी रोजी अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडला होता.

राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेतील मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन; महाराष्ट्राशी होतं खास नातं
Follow us on

अयोध्या येथील मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे , या सोहळ्यात सहभागी होऊन 121 वैदिक ब्राह्मणांचं नेतृत्व करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 86 वर्षांचे होते. ही बातमी कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.

जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पूजा पूर्ण झाल्या. या पूजेत त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या पूजेतही ते सहभागी झाले होते.

महाराष्ट्राशी होतं खास नातं

आज सकाळी लक्ष्मीकांत दीक्षित यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. प्रत्येक प्रकारच्या पूजा विधिमध्ये ते पारंगत होते. त्यांनी वेद आणि अनुष्ठानांची दीक्षा आपले चुलते गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून घेतली होती. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे महाराष्ट्राशी जवळचे नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकामध्ये दीक्षित यांच्या पूर्वजांचाही सहभाग होता असं सांगितलं जातं. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर सनातन परंपरा पाळणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. या वृत्तानंतर पंतप्रधान मोदींचे समर्थक आणि राम मंदिराच्या अभिषेकाची वेळ ठरवणारे गणेशवर शास्त्री द्रविड यांनीही शोक व्यक्त केला.