अयोध्येच्या राम मंदिराच्या निधीत तिपटीने वाढ, पैसे मोजण्यासाठी लागतो इतका अवधी

| Updated on: Mar 14, 2023 | 10:34 PM

राम मंदिराचं काम पू्र्ण होण्यापूर्वीत रकमेत तीन पटीने वाढ झाली आहे. याबाबतची माहिती मंदिर ट्रस्टने दिली आहे. लवकरच मोजणी करण्यासाठी तिरुपती मंदिरासारखी सोय केली जाणार आहे.

अयोध्येच्या राम मंदिराच्या निधीत तिपटीने वाढ, पैसे मोजण्यासाठी लागतो इतका अवधी
राम मंदिरासाठी भक्तांकडून मोठी रक्कम दान, आता पैसे मोजण्यासाठी केली दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Follow us on

अयोध्या : अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती होत आहे. मंदिर उभारण्यासाठी देशभरातील राम भक्त पुढे सरसावले आहे. इतकंच काय तर रोख रकमेत तीन पटीने वाढ झाली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली की, राम भक्त खुल्या मनाने रोख रक्कम दान करत आहेत. ट्रस्ट कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं की, दानपेटीतून निघणाऱ्या रकमेची होणारी मोजणी आणि जमा करण्यासाठी नियुक्त केलेल्या बँक अधिकाऱ्यांनी ट्रस्टला ही माहिती दिली. रोख रकमेत तिपटीने वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“दानपेटीतून निघाणारी रोख रक्कम मोजण्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागतो. 15 दिवसातच दान रक्कम एक कोटींच्या घरात घेली. राम मंदिराची दानपेटी दर दहा दिवसांनी खोलली जाते.”, असं प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं.

“भारतीय स्टेट बँकेने राम मंदिरातील दानपेटीतीली पैसे मोजण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे” असंही प्रकाश गुप्ता यांनी पुढे सांगितलं. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनीही दान रकमेत गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचं सांगितलं आहे.

राम मंदिराबाबत असलेली आस्था आणि दान रक्कम पाहता येणाऱ्या वर्षात तिरुपती बालाजी मंदिर देवस्थान सारखी व्यवस्था करावी लागेल. तिरुपती बालाजी मंदिरा पैसे मोजण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते रोज पैशांची मोजणी करतात.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून मौल्यवान आणि उच्च प्रतीचे सागाचे लाकूड अयोध्येत पाठवले जाणार आहेत. तत्पूर्वी चंद्रपुरात एक भव्य रॅलीचं आयोजन होईल आणि पुजाविधीनंतर 28 किंवा 29 मार्चला ट्रक अयोध्येला रवाना होईल.

जानेवारी 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. राम मंदिर निर्मितीचं काम 75 टक्के पूर्ण झालं आहे. त्यासाठी यंदाच्या रामनवमीला भव्य आयोजन करण्यात आलं आहे.

प्रभू रामांची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शालिग्राम शिला आणण्यात आली आहे. ही शिला खूपच महाग आहे. शालिग्रामचं घरी लोकं विष्णु स्वरुप म्हणून पूजन करतात. गर्भगृहात स्थापित केली जाणारी मूर्ती 5.5 फुट इतकी उंच असणार आहे. त्याच्या खाली दोन फूट पेडेस्ट्रीयल असणार आहे.

इतकंच काय तर सूर्याचे किरणं थेट रामाच्या कपळावर पडतील अशी सोय करण्यात आली आहे. त्याचबरोब तीस फुटावरून रामाचं दर्शन करता येणार आहे.