आझम खान यांना आणखी एक मोठा झटका, तुरुंगवासानंतर आता आमदारकी रद्द

| Updated on: Oct 28, 2022 | 9:23 PM

भडकावू भाषण केल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर आणि शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विधानसभा सदस्यत्व संकटात आल्याचे सांगण्यात येत होते.

आझम खान यांना आणखी एक मोठा झटका, तुरुंगवासानंतर आता आमदारकी रद्द
Follow us on

नवी दिल्लीः समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व आता रद्द करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्या आले. त्यांच्या या निर्णयामुळे विधानसभा मतदारसंघातील रामपूरमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. नुकतेच त्यांना भडकावू भाषण दिल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासोबतच 6 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

भडकावू भाषण केल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर आणि शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विधानसभा सदस्यत्व संकटात आल्याचे सांगण्यात येत होते.

त्यांच्या या शिक्षेस न्यायालयाने जामीन दिला असला तरी आता त्यांना विधानसभेतूनही मोठा धक्का देण्यात आला आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. सभापती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार आझम खान यांना कलम 153 ए, आयपीसी कलम 505(1) आणि लोकप्रतिनिधी कलम 125 अंतर्गत प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

त्याबरोबरच दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावास भोगावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही शिक्षा जाहीर जाहीर झाल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या निर्णय मान्य असल्याचे सांगितले मात्र आपणही पुढील न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये आझम खान हे रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपा-बसपा युतीचे उमेदवार होते. एप्रिल 2019 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मिलक कोतवाली भागातील खतनगरिया गावात जाहीर सभा होती.

त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी अंजनेय कुमार सिंह यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.