भोपाळ : जिवंत समाधी घेणाऱ्या साधू नहेमीच चर्चेत असतात. अशा साधूंचे अनेक अनुयायी देखील असतात. मात्र, जिवंत समाधी घेतल्यानंतर साधू जिवंत झाल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात उघडकीस आला आहे. जिवंत समाधी घेतल्यानंतर 72 तासांनी बाबा प्रकट झाले. बाबांना पाहून त्यांचे भक्त देखील गोंधळले.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे. जिवंत समाधी घेतल्यानंतर 72 तासांनी बाबा प्रकट झाले बाबा पुरुषोत्तमंद महाराज असे या बाबाचे नाव आहे. या बाबाने सात फूट खोल खड्ड्यात तीन दिवस तपश्चर्या केली.
समाधी कालावधीत मी स्वर्ग लोकाचे भ्रमण केल्याचा दावा हा बाबा करत आहे. स्वर्गात जाणारा रस्ता अतिशय प्रकाशमान होता. अतिशय प्रसन्न वातावरण होते.
देवी मातेने मला दर्शन दिले. 11 अनंत शक्तीनी माझ्या शरीरात प्रवेश केल्याचेही या बाबाने आपल्या भक्तांना संगीतले. जिवंत समाधी घेतल्यानंतर 72 तासांनी प्रकट झालेल्या या बाबाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. बाबाने आपला अनुभव भक्तांसमोर कथन केला.
तर, अनेकांनी या बाबाच्या दाव्याला ढोंगीपणा म्हंटल आहे. बाबाचे हे कृत्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याची टीका अनेकांनी केली आहे. भाविकांची फसवणुक करणाऱ्या या बाबावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे.