नवी दिल्ली : देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel price) दरावरून राजकारणाचा भडका उडाला आहे. तर सर्वसामान्याच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागत आहे. गेल्या एका आठवड्यात पेट्रोलचे वाढलेले दर बघितले तर कुणाचेही डोळे पांढरे होतील. आता अशातच योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण 2014 पूर्वी महागाई (Inflation) आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून टीका करणारे रामदेव बाबा आत्ताच्या दराबाबत विचारले असता भडकले आहेत. काही जण रामदेव बाबांचा हाच व्हिडिओ ट्विट (Ramकरत आता बाबांना घेरण्याच्या प्रयत्न करत आहेत. सर्वांना योग शिवकवणारे बाबा असे अचानक भडकल्याने या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अनेकजण हा व्हिडिओ सध्या ट्विट करत आहेत.
2014 से पहले बाबा रामदेव जोर शोर से भाजपा के लिए प्रचार करते थे। भाजपा को वोट देने और ₹40 प्रति लीटर पेट्रोल पाने का वादा करते थे। आज पेट्रोल 100के पार है। पत्रकार ने जब सवाल किया तो पत्रकार को धमकी देने लगे। शर्मनाक। आइए बाबा के सभी प्रोडेक्ट का बहिष्कार करें। #BoycottPatanjali pic.twitter.com/FzfZ41Xg9P
— Hansraj Meena (@HansrajMeena) March 30, 2022
या व्हिडिओत रामदेव बाबा म्हणतात, सर्वजण बोलत आहेत महागाई वाढली आहे, तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, मात्र सरकार बोलत आहे तेलाच्या किंमती नाही वाढवल्या तर टॅक्स नाही मिळणार. मग रोड आणि इतर योजना कशा पुऱ्या होणार? मात्र महागाई कमी झाली पाहिजे, महागाई कमी करायची असेल तर आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल. मी सन्यासी असून पाहटे चार वाजल्यापासून मेहनत करतो. असेच असेल तर मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी. त्यानंतर रामदेव बाबा आधीच्या वक्तव्याबाबत विचारले असता,त्याचे उत्तर टाळताना दिसून आले, तसेच मी माझी मिशी वाढेल असे म्हणालो होतो, असे मिश्किल उत्तर दिली.
रामदेव बाबा एवढच बोलून थांबले नाहीत तर, तर पत्रकरांना रामदेव बाबा डाफरताना दिसून आले, असे प्रश्न विचारू नका, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही. तेव्हा मीच बोललो होते, आता बोलत नाही, काय करशील? आणि पुन्हा हा प्रश्न विचारशील तर ठिक नाही होणार, असा इशाराच थेट रामदेव बाबांनी प्रश्न विचारणाऱ्याला दिला. त्यामुळे रामदेव बाबांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. इतर वेळी रामदेव बाबांना आपण अत्यंत शांत आणि संयमी रुपात बघतो, मात्र महागाई बाबात विचारले असता, शांत आणि संयमी बाबांचा थेट भडका उडाल्याचे दिसले.
Today’s gold, silver prices : सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार