कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर क्राइम ब्रॅंचने दोन शूटरना अटक केली आहे. यापैकी एकाचे नाव गुरमैल बलजीत सिंह (23) असे असून हरियाणाचा रहिवासी आहे. युपीतील बहराईच येथे राहणारा दुसरा आरोपी धर्मराज राजेश कश्यप (19) असे असून तिसरा आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा फरार आहे.धर्मराज आणि गुरमैल बलजीत सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. बहराइचच्या एसपी वृंदा शुक्ला यांनी दोन्ही आरोपी युपीचे असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही आरोपी एकाच गावचे ( गंडारा ) रहिवासी आहे. दोघांचे वय – 17 ते 18 वर्षांचे आहे. दोन्ही आरोपी पुण्यात भंगारचा व्यवसाय करायचे त्यांचा बहराइचमध्ये कोणताही गुन्हेगारीचा पूर्व इतिहास नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
तिसरा आरोपी शिवा याच्या शोधासाठी क्राइम ब्रॅंचने 15 पथकं स्थापन केली आहे. शिवा आणि धर्मराज यांची अलिकडेच सिद्धीकी यांच्या हत्येसाठी नेमणूक झाली होती. अशा प्रकारे नवख्या तरुणांचा वापर लॉरेन्स बिष्णोई गॅंग गुन्हेगारी कृत्यासाठी करत आली आहे.काही महिन्यांपूर्वी धर्मराज यालाही पुण्यात शिवाने कामासाठी शिवाने बोलावले होते. सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांच्या गुरमैल याची भेट घडविली होती. मार्च महिन्यात धर्मराज आणि शिवकुमार मुंबईत आले होते. यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांना काही माहिती नव्हती.
धर्मराज यांच्या आई-वडीलांना बहराईच पोलिसांना ताब्यात घेतले आहे. शिवाच्या वडीलांनी आपल्या मुलाला फसी पाडले असल्याचा आरोप केला आहे. तर धर्मराज याच्या आईने धर्मराज दिल्लीला जाणार असल्याचे आपल्याशी बोलला होता. तो मुंबईत कसा काय गेला माहिती नाही असेही त्याची आई म्हणाली. हे शुटर अंडरवर्ल्डमध्ये स्वत:चे नाव करायचे वेडाने सामील झाले होते. त्यासाठी त्यांनी बाबा सिद्धीकी यांची हत्या केली. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या सदस्याशी पंजाबच्या जेलमध्ये तिघांची भेट झाली होती.
तिसरा आरोपी गुरमैल हा हरियातील कॅथल जिल्ह्यातील नरड गावाचा रहिवासी आहे. साल 2019 मध्ये एका युवकाची हत्या केल्याच्या प्रकरणात तो कॅथल जेलमध्ये होता. जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईला गेला. तेथे लॉरेन्सच्या गुंडांशी त्याचे संबंध निर्माण झाले. त्याच्या आई-वडीलांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तो अनेक वर्ष त्याच्या गावात आलेला नाही. आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने बाबा सिद्धीकीच्या घर आणि कार्यालयाची रेकी केली होती.दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत रहात होते आणि सिद्धीकीवर नजर ठेवून होते. मुंबई क्राइम ब्रॅंच या प्रकरणाचा तपास करीत आहे.