नवीन वर्षाला सुरुवात होत आहे,2025 वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाला एक उत्सुकता असते, येणारं वर्ष माझ्यासाठी कसं जाणार? नवीन वर्षात माझ्या इच्छा पूर्ण होणार का? याबाबत प्रचंड उत्सुकता असते. नवीन वर्षात तुमच्यासोबत काय -काय होऊ शकतं? यासंदर्भात जाणून घेण्यासाठी तुम्ही कधी ज्योतिषाकडे देखील गेला असाल, यासंदर्भात अनेकजण अनेक भविष्यवाणी करत असतात.नव्या वर्षासंदर्भात अशीच एक भविष्यवाणी जगप्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा यांनी देखील आपल्या मृत्यूपूर्वीच करून ठेवली आहे.2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी आपल्या या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे.
नेमकी काय आहे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी?
बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाचं भाकीत वर्तवताना असं म्हटलं आहे की, या वर्षात अशा अनेक घटना घडतील ज्या घटना मानवी जीवन हे मुळापासून बदलून टाकतील.या काळात युरोपमध्ये गृहयुद्ध होईल, राजकीय अस्थिरता निर्माण होईल, युरोपमध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर ती संपूर्ण मानवी जातीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. याचा परिणाम म्हणजे झपाट्यानं लोकसंख्या कमी होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.बाबा वेंगा यांनी 2025
बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे, ती म्हणजे याचवर्षी कँन्सर सारख्या दुर्धर आजारावर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश येईल, यामुळे कँन्सरसारखा आजार सहजपणे बरा होऊ शकेल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
मानवाला सुरुवातीपासूनच दुसऱ्या जगाबद्दल मोठं कुतुहल आहे. ऐलियन्सबद्द देखील शोध सुरू आहे ऐलियन्ससंदर्भातील संशोधनात मानवाला मोठं यश मिळेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी असंही म्हटलं आहे, की 2025 मध्ये अशा अनेक अप्रिय घटना घडू शकतात, जी जगाच्या अंताची सुरुवात असू शकते.
बाबा वेंगा या त्यांच्या भविष्यवाणीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही घटनांचा उल्लेख केला होता, त्या घटना त्यांच्या मृत्यूनंतर खऱ्या झाल्या असा दावा केला जातो. अमेरिकेवर झालेला 9/11 चा जो हल्ला आहे, त्यासंदर्भात देखील बाबा वेंगा यांनी आधीच सांगितलं होतं असा दावा केला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)