By Election Results 2022 : देशातील 1 लोकसभा आणि 4 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे (TMC)शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले आहेत, तर बालीगंगे विधानसभा मतदारसंघात टीएमसीचे बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) विजयी झाले आहेत. दुसरीकडे, बिहारमधील बोचाहान विधानसभेच्या जागेवर आरजेडीचे अमर पासवान विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने कमबॅक केले आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा जवळपास 19,000 मतांनी पराभव केला. छत्तीसगडमधील खैरागड विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचला. आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा सुमारे २ लाख मतांनी विजयी झाले आहेत. या जागेवरून टीएमसी कधीही जिंकली नव्हती, त्यामुळे या विजयाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे बालीगंगे विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. दुसरीकडे, शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. तर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंगे विधानसभा मतदारसंघांतून भाजपच्या उमेदवार काया घोष यांचा पराभव केला. त्यामुळे देशातील या पोटनिवडणूकात भाजपला (BJP) रिकाम्या हातांनी जावं लागत आहे.
पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीने विजय मिळवला आहे. बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत बाबुल सुप्रियो विजयी झाले आहेत. सुप्रियो यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी CPI(M) च्या सायरा शाह हलीम यांचा 19,904 मतांनी पराभव केला. आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभेत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर टीएमसी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेचे आभार मानले. सुरुवातीच्या टप्प्यापासून बऱ्यापैकी आघाडी मिळवणाऱ्या बाबुल सुप्रियो यांनी अखेर आपला विजय निश्चित केला. त्याचवेळी या जागेसाठी भाजपला तिसऱ्या तर काँग्रेसला चौथ्या क्रमांकाचा मते मिळाली.
खरं तर बालीगंगेचे आमदार आणि टीएमसी सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली. बालीगंज येथील डेव्हिड हेअर ट्रेनिंग कॉलेजमध्ये शनिवारी झालेल्या मतमोजणीच्या १९ फेऱ्यांनंतर टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांचा 20038 मतांच्या फरकाने पराभव केला.
बाबुल सुप्रियो यांनी आपल्या विजयानंतर म्हणाले की, मां, माटी, मानुष की जीत है. तसेच आसनसोलमध्ये टीएमसीचा विजय ही भाजपच्या तोंडावर चपराक आहे. तसेच ते म्हणाले, मी भाजपसाठी दोन गोल केले होते, आता मी टीएमसीसाठी 10 गोल करेन. तसेच मी, ज्या पक्षात राहतो त्या पक्षासाठी मी माझा जीवही देतो. मला ते सिद्ध करण्याची गरज नाही. यापूर्वी मी भाजपसाठी 2 गोल केले होते, आता मी टीएमसीसाठी 10 गोल करेन. 20,000 अधिक मतांचा विजय मी ममता बॅनर्जी आणि TMC संघटनेला समर्पित करतो. तसेच मोठे नेते काम करत आहेत. सर्व चांगले काम करत आहेत. दोन लोकांच्या फरकाने टीएमसी संघटनेत प्रवेश होत आहे. कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहेत. हा जनतेचा आणि सर्वसामान्यांचा विजय आहे. तर बाबुल सुप्रियो यांच्या विजयानंतर बंगालमध्ये असे तर्क लावले जात आहेत की, ते ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सामील होतील.
बंगालमध्ये पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने इतिहास रचण्याकडे वाटचाल करत असतानाच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या विजयाबद्दल ट्विट केले. तसेच त्यांनी यात, जनतेचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.