Atique ahmed : अतिक अहमदच्या हत्येनंतर बागेश्वर बाबाने घेतला मोठा निर्णय, शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

| Updated on: Apr 18, 2023 | 1:42 AM

दोन माफियांच्या हत्येनंतर पोलिसांच्या सुरक्षेवरच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विरोधी पक्षानेही यावरून योगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच कायम चर्चेत असणाऱ्या बागेश्वर बाबाने या हत्येनंतर मोठा निर्णय घेतला आहे.

Atique ahmed : अतिक अहमदच्या हत्येनंतर बागेश्वर बाबाने घेतला मोठा निर्णय, शेअर केला तो व्हिडीओ
Follow us on

मुंबई : देशात सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दोन माफियांच्या हत्येनंतर पोलिसांच्या सुरक्षेवरच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विरोधी पक्षानेही यावरून योगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच कायम चर्चेत असणाऱ्या बागेश्वर बाबाने या हत्येनंतर मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत बागेश्वर बाबाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

 

प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना अतिक आणि अशरफ यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. या घटनेमुळे वातावरण बिघडलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कुठेही जमाव जमवणं कायद्याच्या विरोधात आहे. याच पार्श्वभूमीवर कानपूरमध्ये होणारी  5 दिवसांची हनुमान कथा पुढे ढकलावी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या एन्काऊंटर करण्यात आल्याचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अशरफ आणि अतिकची कशी हत्या करण्यात आली आणि अवघ्या दहा सेकंदात कसा खेळ खल्लास झाला हे दिसत आहे.

दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. या घोषणा कुणी दिल्या ते स्पष्ट होऊ शकलेले नाहीत. हल्लेखोरांनीच या घोषणा दिल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. हे हल्लेखोर कोण आहेत? त्यांनी अतिक आणि अशरफला का मारले? हे हल्लेखोर कोणत्या गँगचे आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.