दिल्ली : बकरी ईद मुस्लीम बांधवाचा महत्वाचा सण आहे. इस्लाम धर्मातील मान्यतेनूसार हजरत इब्राहिम साहब हे त्यांचा मुलगा हजरत इस्माईल याला अल्लाच्या आदेशाने कुर्बान करायला निघाले होते. तेव्हा अल्लाह ने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. यामुळेच हा पवित्र सण साजरा केला जातो. यंदा हा सण उद्या 29 जून रोजी साजरा केला जात आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आले आहेत. चला या सणाबद्दल काही रोचक माहीती जाणून घेऊयात…
१ ) इस्लाम धर्मानूसार अल्लाह ने जेव्हा हजरत इब्राहिम साहब यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्या सर्वात प्रिय वस्तू मागितली होती. तेव्हा हजरत इब्राहिम साहबने त्यांचा लाडका पूत्र ज्याच्या ते सर्वात जास्त प्रेम करीत होते त्यास अल्लासाठी कुर्बान करायचा निर्णय घेतला होता.
२ ) अल्लाह च्या आदेशानूसार जेव्हा हजरत इब्राहीम आपल्या मुलाची कुर्बानी द्यायला गेले तेव्हा अल्लाह ने त्यांच्या मुला ऐवजी एका बकऱ्याची कुर्बानी दिली. तेव्हा पासून बकरी ईद सण सुरु झाला.
३ ) ईदला बकऱ्याची कुर्बानी देणे बंधनकारक नाही. तुम्ही अल्लाहचा नेक बंदा म्हणून तुमचा वेळ किंवा धन देखील कुर्बानीच्या रुपात कुर्बान करु शकता.
४ ) बकरी ईदला शारीरिक दृष्ट्या आजारी असलेल्या बकऱ्याची कुर्बानी देता येऊ शकत नाही, तसेच छोट्या प्राण्याची ही कुर्बानी देऊ शकत नाही.
५ ) कुराणच्या मते अल्लाह कडे हाडे, मांस किंवा रक्त पोहच नाही तर अल्लाह केवळ तुमचा दातृत्व किती आहे हे पाहात असतो, ज्याला उर्दूत खुशु देखील म्हटले जाते.
६ ) या दिवशी नमाज झाल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. कुर्बानीनंतर मांस तीन हिश्यात वाटावे, पहिला हिस्सा आपल्या घरासाठी ठेवावा, दुसरा हिस्सा गरीबांना दान करावा तर तिसरा हिस्सा नातेवाईकांत वाटावा असा नियम आहे.
७ ) कुर्बानी एक मोठा नियम आहे तो म्हणजे जर तुमच्याकडे 613 ते 614 ग्राम चांदी आहे किंवा या चांदीच्या बराबरीचे धन आहे. किंवा घर, गाडी किंवा दागिने आहेत. तर त्यांना कुर्बानी देणे गरजेचे आहे.
८) एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे जर तु्म्हाला कुर्बानी द्यायची असेल तर तुमच्या डोक्यावर कोणतेही कर्ज असायला नको.
९ ) कुराणाच्या नियमानूसार जर कोणतीही व्यक्ती आपल्या कमाईची अडीच पट रक्कम दान करीत असेल तर त्याला कुर्बानी देण्याची काहीही आवश्यकता नाही.
१० ) बकऱ्याची किंमत येथे काही महत्वाची नाही. आपण जर अल्लाच्या आदेशाप्रमाणे पुण्याचे काम करीत असाल. तर तुमचा दानधर्म करण्याचे दातृत्व पाहिले जाते. अल्लाह त्यांच्या नेक बंद्यांवर कायम आशीर्वाद देतो असे म्हटले जाते.