सर्वप्रकारच्या मांज्यांवर देशात बंदी घाला, इंडीयन मेडीकल असोसिएशनचे केंद्राला पत्र

| Updated on: Feb 18, 2023 | 10:00 AM

मांजांच्या धारदार धाग्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर इंडीयन मेडीकल असोसिएशनने केंद्राला पत्र लिहून सर्वच प्रकारच्या मांज्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सर्वप्रकारच्या मांज्यांवर देशात बंदी घाला, इंडीयन मेडीकल असोसिएशनचे केंद्राला पत्र
MANJA
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : इंडीयन मेडीकल असोसिएशनने ( IMA ) केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून पतंगांच्या मांज्यामुळे अनेकांचे अपघातात मृत्यू होत असल्याने या मांज्यांवर ( MANJA ) बंदी घालण्याची मागणी केली आहे. मांजांवर सरकारने राष्ट्रीय (national ) पातळीवर व्यापक धोरण तयार करून बंदी घालण्यासाठी रणनीती तयार करावी अशी मागणी इंडीयन मेडीकल असोसिएशन केली आहे. इंडीयन मेडीकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद कुमार अग्रवाल यांनी 14 फेब्रुवारीला केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहीले आहे.

इंडीयन मेडीकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद कुमार अग्रवाल यांनी 14 फेब्रुवारीला केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना एक पत्र लिहीले आहे. त्यात पत्रात त्यांनी लिहीले आहे की एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून कांच, धातू किंवा अन्य धारदार वस्तूंपासून तयार केलेले हे धागे मानवी जीवनासाठी असल्याचे आम्ही धोकादायक असल्याचे प्रमाणित करीत आहोत. हे धागे केवळ मनुष्या बरोबरोबर पक्ष्यांसाठी देखील धोकादायक आहेत. चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरा सारखे राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश या मांज्यांवर प्रतिबंध करण्यासाठी धोरण ठरवित आदेश जारी करीत आहेत. बंदी घातलेल्या धाग्यांंमध्ये कांच,धातू आणि अन्य वस्तूंपासून तयार केलेल्या धाग्यांचाही समावेश आहे.

अशा घटनांनी उग्र स्वरूप धारण करण्याआधीच सुरूवातीच्या टप्प्यावरच अशा मांजांवर  बंदी घालण्यासाठी व्यापक धोरण ठरवले जावे. साधे सुती धाग्यांनी केलेली पंतगबाजी सर्वांसाठी मनोरंजक होऊ शकते. आम्ही केंद्राला आवाहन करत आहोत की सर्व प्रकारच्या मांज्यांवर बंदी घालण्यात यावी.

अनेक निर्दोष व्यक्तींचे गेले प्राण

आयएमएने लिहिलेल्या पत्रात घातक मांजामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांचे बळी गेले आहेत. गेल्या काही आठवड्यापूर्वी मांजाने नागपूरात अकरा वर्षांच्या मुलाचा, भावनगरात दोन वर्षांच्या मुल, भिंवडी 47 वर्षांच्या व्यक्तीचा, पुण्यात 45 वर्षांच्या व्यक्तींचा बळी गेला आहे. तर नडीयाडमध्ये ३५ वर्षीय व्यक्ती, वडोदरामध्ये तीस वर्षीय, सुरतमध्ये 52 वर्षीय आणि मेहसानात तीन वर्षीय मुलांचा बळी गेला आहे, याशिवाय जणांना मांज्याने गंभीर जखमी केले आहे.

पेटाने मानले आभार

पिपल फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स ( पेटा ) इंडीयाने मांजा संदर्भात आयएमएने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. या प्राणिमित्र संघटनेचे भारतातील अधिकारी फरहत उल ऐन यांनी सांगितले नायलऑन, चिनी, मांजा तसेच काचेच्या भुकटी, धातू पासून तयार होणाऱ्या मांजाना रोखण्यासाठी उचलेल्या पावलांमुळे आम्ही मेडीकल असोसिएशनचे आभारी आहोत. लहान मुले आणि प्राणी यांना या मांजांपासून होणाऱ्या धोक्याला रोखण्यासाठी काही उपाय नाहीत, मानवाला या घातक वस्तू पासून वाचण्यासाठी कोणतीही संधी नाही.

अनेक लोकांना मांजाचा फटका

यंदा जानेवारीमध्ये गुजरातमध्ये मांजाने दहाहून अधिक जणांचा बळी गेला. राज्यात 14 आणि 15 जानेवारीला एकूण 1,281 दुर्घटना घडल्या.जालंधरात धातूच्या धाग्यामुळे वीजप्रवाहाने मुलाचे नव्वद टक्के शरीर भाजल्याचे उघडकीस आले आहे.