सीमा हैदर नंतर आता सानिया… प्रियकरासाठी तिने बांग्लादेशहून गाठले नॉएडा, पण…

| Updated on: Aug 22, 2023 | 1:27 PM

प्रेमासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या खूपच चर्चा आहे. तिच्याप्रमाणेच आता आणखी एका महिलेची माहिती समोर आली आहे जी तिच्या प्रेमासाठी बांग्लादेशमधून थेट नोएडा येथे आली आहे. पण...

सीमा हैदर नंतर आता सानिया... प्रियकरासाठी तिने बांग्लादेशहून गाठले नॉएडा, पण...
Follow us on

नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा पार करत पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (seema haider) सध्या बरीच चर्चेत आहे. तिच्यावरून सध्या बराच गदारोळ सुरू असताना आता अशा अनेक प्रेम कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक कहाणी आहे सानियाची…. बांग्लादेशमध्ये (bangladeshi woman) राहणारी सानिया तिच्या एका वर्षाच्या मुलाला घेऊन भारतात आली आहे. सानिया अख्तर अस तिचं पूर्ण नाव आहे.

सानिया ही बांग्लादेशमधून व्हिसा घेऊन तिचा पती सौरभ कांत तिवारी याला भेटण्यासाठी आली आहे. सानिया आणि सौरभ यांनी तीन वर्षांपूर्वी लग्न केले होते, असे सांगितले जात आहे. त्यांना एक मुलगा असून तो आता एक वर्षाचा आहे. सानिया तिच्या लेकाला घेऊन त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी नोएडा येथे आली खरी, पण इथे आल्यावर तिला जे कळलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकरली. सानियाचा पती सौरभ याने इथे येऊन दुसरं लग्न केल्याचं समोर आलं आहे.

वर्षभराच्या लेकासह बांग्लादेशवरून गाठलं नॉएडा

तिचा पती सौरभ तिला त्याच्यासोबत ठेवू इच्छित नाही, असे सानियाने सांगितलं आहे. पण तिला कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याला सोडायचं नाहीये, असंही सानियाने स्पष्ट केलं आहे. यानंतर हे प्रकरण नोएडा पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. सोमवारी सानियाने तिच्या मुलासह सेक्टर 108 येथील पोलिस आयुक्त कार्यालय गाठलं आणि मदतीची याचना केली. तिने सांगितलं की, सौरभ हा बांगलादेशातील ढाका येथील कल्टी मॅक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होता

पोलिसांनी सुरू केला तपास

तिने पोलिसांना सांगितले की, तिचे नाव सानिया अख्तर आहे. ती भारतात, तिचा पती सौरभ सोबत राहायला आला आहे पण तो तिला सोबत ठेवण्यास तयार नाही. याप्रकरणी आपली मदत करावी, अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.