मुंबई, नोव्हेंबर महिना संपायला फक्त 6 दिवस शिल्लक आहेत आणि वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर (December 2022) सुरू होणार आहे. नवीन वर्ष, नाताळ व्यतिरिक्त इतर अनेक दिवशी बँका डिसेंबरमध्ये बंद राहतील (Bank Holliday List). अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते लवकरात लवकर आटोपणे योग्य राहील, कारण पुढील महिन्यात एकूण 13 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. या सुट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या डिसेंबर 2022 च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांसह महिन्यातील सुमारे अर्धे दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. अशा परिस्थितीत ही यादी तपासून घराबाहेर पडणे योग्य ठरेल.
डिसेंबर महिन्याच्या बँक हॉलिडे कॅलेंडरवर नजर टाकल्यास 3, 12, 19, 24, 26, 29, 30, 31 रोजी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल, तर 4, 10 रविवार साप्ताहिक आहेत. डिसेंबरचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता 11, 24, 25 रोजी सुटी असेल. यावेळी ख्रिसमस रविवारी आला आहे.
विशेष म्हणजे, बँक हॉलिडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असते. म्हणजेच, ते राज्य आणि शहरांमध्ये भिन्न आहेत. तथापि, बँकांच्या शाखा बंद असल्या तरी, ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमची कामं सुरळीत करू शकता. ही सुविधा नेहमीच 24 तास कार्यरत राहील.