रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी दरवर्षी प्रमाणे यंदाही जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील प्रमुख सणांच्या दिवशी होणाऱ्या सुट्ट्यांचाही उल्लेख आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकेच्या सुट्ट्या बदलू शकतात. कारण जानेवारी महिन्यात गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस, मकर संक्रांत,असे अनेक सण येत असतात. त्याबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तसेच शनिवार आणि रविवार पकडता असे मिळून एकुण १६ दिवस बँका बंद राहणार आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिनी बँकांना नेहमी प्रमाणे सुट्टी असते, मात्र यंदा प्रजासत्ताक दिवस हा रविवारी येत असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी तशीच राहणार आहे. म्हणजेच देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील, तर इतर राज्यांमध्ये बँका नेहमी सारख्या सुरू राहणार आहेत. या व्यतिरिक्त जानेवारी महिन्यात कोणत्या तारखेला बँका कुठे बंद राहणार आहेत हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला जाणून घेऊयात.
बँक बंद असतानाही डिजिटल बँकिंग अनेक प्रकारच्या सुविधा देत आहे. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि अगदी व्हॉट्सॲप बँकिंगसह ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आलेले आहेत हे विविध आर्थिक व्यवहारांसाठी सुरक्षित आणि कार्यक्षम प्रदान करतात. ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म मजबूत एन्क्रिप्शनचा वापर करतात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेची शाखा बंद झाल्यानंतरही बिल भरणे, निधी हस्तांतरण आणि खाते चौकशी सारख्या व्यवहारसुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही बँक सुट्टीच्या दिवशी व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या मदतीने व्यवहार करू शकता.