अयोध्या | 19 जानेवारी 2024 : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी देशभरातीस साधु संतांची मांदियाळी येथे जमली आहे. यातच मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून आलेल्या एका अनोख्या साधूबाबांची येथे खूपच चर्चा सुरु आहे. हे साधूबाबा चक्क बजाज एवेंजर बाईकवरुन येथे दाखल झाले आहेत. हे बाबा आपल्या बाईकला सनातनचा रथ म्हणत आहे. या बवंडर बाबानी आधुनिक आपल्या बाईकला मोबाईल स्टॅंड लावला आहे. हातांना एल्बो प्रोटेक्टर आणि गुडघ्याला नी-गार्ड आणि डोक्याला हेल्मेट लावून हे बाबा बाईकवरुन अयोध्येत बाईकचे एक्सलेटर फिरवित धुर उडवित फिरत आहेत.
अयोध्येत राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची लगबग सुरु आहे. देशभरातून येथे साधू आणि संत देखील पोहचले आहेत. त्यातच बजाज बाईकवरुन आलेल्या एका बवंडर बाबाच्या आगमनाने येथील रामभक्त आश्चर्यचकीत झाले आहेत. या अनोख्या बाईकवाल्या बाबासोबत लोक सेल्फी घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. बाबा देखील कोणलाही निराश न करता सर्वांना सवडीने फोटो घेऊ देत आहेत. बाबांच्या भगव्या रंगाच्या बाईकला पुढे रुद्राक्षांची माळ टांगलेली आहे. फ्रंट व्हीलजवळ राम ध्वज झळकत आहे. हे बाबा आपल्या बजाज एवेंजर बाईकवरून रपेट मारीत प्रवास करीत आहेत. हजारो किमीचा प्रवास करून आपण येथे आलो आणि रामललाची मूर्ती पाहून भावूक झाल्याचे ते म्हणतात.
बवंडर बाबा सनातन धर्माबाबत लोकांना जागरुक करीत आहेत. यासाठी ते बाईकवरुन प्रवास करीत आहेत. माचिस, अगरबत्ती आणि रैपरवर हिंदू देवदेवतांचे छायाचित्रे छापू नका असा संदेश ते देत आहेत. या प्रकरणात आता सहा मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिले आहे.
अयोध्येच्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी होणार आहे. राम मंदिरातील गर्भगृहात मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत दुपारी 12.15 ते 12.45 दरम्यान हा सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देशभरातील सुमारे 7 हजाराहून अधिक भक्त उपस्थित राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.