सोने खरेदी करताना सावधान, जाणून घ्या काय झाला नियमात बदल

| Updated on: Mar 04, 2023 | 8:36 AM

येत्या 1 एप्रिल पासून सोने खरेदी आणि विक्रीच्या नियमात महत्वाचे बदल होत आहेत. काय आहेत हे बदल पाहूया..

सोने खरेदी करताना सावधान, जाणून घ्या काय झाला नियमात बदल
gold-rate
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : आपण जर सोने जर 30  मार्चनंतर सोन्याची खरेदी किंवा विक्री करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी आणि विक्रीचे नियम बदलले आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या आदेशानूसार 31  मार्च 2023 नंतर नविन हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या अन्य वस्तूंना विकता येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ठ केले आहे.

केवळ सहा डिजिटवाले हॉलमार्कच मान्य

चार डिजिट आणि सहा डिजिट हॉलमार्किंग संदर्भात असलेला सर्व सामान्यांच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानूसार एक एप्रिलपासून केवळ सहा डिजिटवाले हॉलमार्कच मान्य करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ठ केले आहे. या सहा आकडी हॉलमार्क शिवाय सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी विक्री करणे शक्य होणार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने चार आकडी हॉलमार्कवर संपूर्णपणे बंदी घातली आहे.

सोन्याच्या हॉलमार्कमुळे सोने शुद्धतेची गॅरंटी मिळता असते. हा निर्णय 16  जून 2021 पर्यंत स्वैच्छीक स्वरूपाचा होता. परंतू सरकारने नंतर सोने खरेदी आणि विक्रीला हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात हा आदेश देशातील 256 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला, आता देशातील 51 जिल्ह्यांचा यात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

HUID क्रमांक म्हणजे काय ? 

हॉलमार्क यूनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर हा सोन्याची गुणवत्ता ओळखण्यासाठी असतो. (HUID) हा सहा आकडी क्रमांक अल्फान्यूमेरिक कोड आहे. या क्रमांकामुळे ग्राहकांना गोल्ड ज्वेलरीसंबंधी योग्य आणि खात्रीलायक माहिती मिळत असते. या शिवाय ज्वेलर्सना ही माहिती बीआयएस संस्थेच्या पोर्टलवरही टाकावी लागते.

बीआयएस संस्थेची बैठक 

भारतीय मानक ब्युरोच्या ( बीआयएस ) कारभाराविषयी शुक्रवारी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी बैठक घेत संस्थेच्या देशभरातील पायाभूत क्षमतेवाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. बीआयएसला विविध उत्पादनांचे परीक्षण आणि बाजारातील निरीक्षण वाढविण्यास सांगितले आहे. प्रेशर कुकर, हेल्मेट आणि उत्पादनांची उत्तम गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना पूर्ण करण्यासाठी बीआयएस अधिक सजग रहाण्यासाठी सांगण्यात आले आहे.