जाेधपूर, भारत-पाकिस्तान युद्धावर आधारीत ‘बॉर्डर’ चित्रपट (Border Movie) तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटातील गाणे आजही लाेकप्रीय आहेत. या चित्रपटातील एक दृश्य तुम्हाला आठवत असेल, ज्यामध्ये एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात आग लागते आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) कुराण वाचवण्यासाठी घरात जातो. खरं तर, सुनील शेट्टीची ही व्यक्तिरेखा राजस्थानमध्ये राहणाऱ्या भैरो सिंगवर (Bhairon Singh) आधारित आहे. युद्धभूमीवरचे खरे नायक भैरो सिंह राठोड यांचे काल 19 डिसेंबर रोजी निधन झाले. 1971 च्या लोंगेवाला युद्धात (Longewala War) त्यांनी भाग घेतला होता. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफनेही त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला.
भैरो सिंह यांचा मुलगा सवाई सिंह यांने प्रसारमाध्यमांना सांगितले की, सुनील शेट्टी यांना भेटावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. आम्ही खूप प्रयत्न केले, मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही असे सवाई सिंह म्हणाले. त्यांच्या निधनाची बातमी कळरात सुनील शेट्टी यांना अश्रू अणावर झाले. ज्या व्याक्तिरेखेमुळे सुनील शेट्टी यांच्या करियरला वेगळी दिशा मिळाली त्यांचे निधन अत्यंत क्लेशदायक असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला.
Rest in Power Naik Bhairon Singh Ji. Heartfelt condolences to the family ? https://t.co/5A531HeouG
— Suniel Shetty (@SunielVShetty) December 19, 2022
भैरो सिंह यांनी सोमवारी जोधपूरच्या एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. लोंगेवाला युद्धादरम्यान ते जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर तैनात होते. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना 1972 मध्ये सेना पदक देण्यात आले. 1987 मध्ये ते नाईक म्हणून निवृत्त झाले.
5 डिसेंबर 1971 रोजी भैरोसिंह हे लोंगेवाला पोस्टवर बीएसएफच्या तुकडीचे कमांडर होते. त्यांच्यासोबत 23 पंजाब रेजिमेंटचे 120 सैनिक होते. जेव्हा पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला तेव्हा तात्काळ मदत न मिळाल्याने सैनिकांना माघार घेण्यास सांगण्यात आले, परंतु भैरोसिंह मागे हटले नाहीत. सैनिकांसह त्यांनी पाकिस्तानी सैन्याला लोंगेवाला चौकीच्या पलीकडे जाऊ दिले नाही. बॉर्डर चित्रपटाची कथाही यावर आधारित आहे.