ड्रेस कोड, रोज 5 तासाचा ब्रेक, उत्सवाचा खास प्लान… राहुल गांधी यांची पदयात्रा अशी

| Updated on: Sep 10, 2022 | 5:19 PM

भारत जोडो पदयात्रेला 150 दिवस लागणार असून राहुल गांधी या पदयात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पदयात्रा आल्यानंतर त्या मार्गातील अनेक नागरिक थेट राहुल गांधींना येऊन भेटत आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत.

ड्रेस कोड, रोज 5 तासाचा ब्रेक, उत्सवाचा खास प्लान... राहुल गांधी यांची पदयात्रा अशी
Follow us on

कन्याकुमारीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेने (Bharat Jodo Yatra) साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. राहुल गांधी यांचा ड्रेस कोड, रोज पाच तासाचा ब्रेक आणि उत्सवाचा खास प्लान अशा पद्धतीने राहुल गांधी यांची पदयात्रा आता सुरु झाली आहे. राहुल गांधी यांच्या बरोबर काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने अनेक नागरिक या पदयात्रेत सामील झाले आहेत. कन्याकुमारीपासून (Kanyakumari) सुरू झालेली ही पदयात्रा काश्मिरला जाऊन थांबणार आहे. त्यामुळे हा दीर्घ प्रवासाला पाच महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे या पदयात्रेसाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरपासून तामीळनाडूतील कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. काँग्रेसची ही पदयात्रा 12 राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशातून जात काश्मीरमध्ये थांबणार आहे.

पदयात्रेला 150 दिवस लागणार

या पदयात्रेला 150 दिवस लागणार असून राहुल गांधी या पदयात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. पदयात्रा आल्यानंतर त्या मार्गातील अनेक नागरिक थेट राहुल गांधींना येऊन भेटत आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधत आहेत.

जनमत जाणून घेणार

भारतात होणाऱ्या 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लोकमत जाणून घेण्यासाठी, जनमत आपल्या पारड्यात टाकण्यासाठी भारत जोडो यात्रेचे आयोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.

3 हजारपेक्षा लांब पल्याचा प्रवास

कन्याकुमारीपासून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रेत 3 हजार 500 किलो मीटरचा प्रवास केला जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी काँग्रेस आणि स्वतः आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसोबत जोडून घेण्यासाठी काँग्रेसची भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक प्रतिमा उंचवण्यासाठी युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही यात्रा करत आहेत. पाच महिने चालणाऱ्या या पदयात्रेत सहभागी नेत्यांना सर्व सुविधाही देण्यात येत आहेत.

पाच तासाचा ब्रेक

काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ड्रेस कोडचाही विचार केला गेला आहे. त्याबरोबरच राहणे, जेवणाची व्यवस्थाही केली गेली आहे. पदयात्रा करणाऱ्यांसाठी पाच तासाचा ब्रेक, सणसमारंभासाठी सुट्टी, कपड्यांपासून ते अगदी बेडसीट धुण्यापर्यंतची व्यवस्था केली गेली आहे.

पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा  ताफा

या पदयात्रेसाठी 60 कंटेनरचा एक ताफाच या भारत जोडो यात्रेबरोबर आहे. या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना हॉटेलची व्यवस्था मिळाली नाही मात्र त्यांना कोणत्याही सुविधांपासून लांबही ठेवण्यात आले नाही.