Independence Day 2022 | दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यास एव्हाना सुरुवात ही झाली आहे. तुम्ही आता कार्यालयाच्या आवारात, शाळेच्या प्रांगणात उभे असाल आणि देशभक्तीपर गीतांनी (patriotic songs) माहौल तयारी ही झाला असेल. ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करण्यासाठी भारत सरकारने असंख्य उपक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिमही राबविण्यात येत आहे. भारत हा “विविधतेत एकता” असलेला देश आहे. या भुमिवर विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक सण भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात, आज तर राष्ट्रीय सण आहे. आज प्रत्येकाचे मन राष्ट्रप्रेमाने उचंबळून आलेले आहे. या दिनाशी संबंधित काही रोजक बाबी आता आपण पाहुयात.
तुम्हाला माहिती आहे का की, 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्ता येथील पारसी बागान स्क्वेअरवर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरवा अशा आडव्या पट्ट्यांचा होता. लालपट्टीवर सलग आठ पांढरी कमळे होती. हिरव्या पट्टीच्या डाव्या बाजूला एक पांढरा सूर्य आणि चंद्रकोर होती, तर उजवीकडे एक तारा होता.
सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टागोरांनी 1911 मध्येच बंगाली भाषेत ‘जन गण मन’ लिहिले असले तरी 1950 मध्ये ते आपल्या देशाचे राष्ट्रगीत बनले.
सध्याच्या राष्ट्रध्वजाची पहिली आवृत्ती पिंगली व्यंकय्या यांनी 1921 मध्ये बेजवाडा येथे बनवली होती. हा ध्वज दोन रंगांनी तयार करण्यात आला होता.लाल आणि हिरवा जे दोन प्रमुख समुदायांचे प्रतिनिधित्व करत होते. गांधीजींनी भारताच्या उर्वरित समुदायांच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून पांढऱ्या पट्टीवर चरखा जोडण्याची सूचना केली होती.
15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न झाला होता, पण गांधीजी या उत्सवात सहभागी होऊ शकले नाहीत. ते त्यावेळी हिंदू-मुस्लीम दंगल थांबवण्याचे कार्य करीत होते.
प्रत्येक स्वातंत्र्यदिनी माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. पण 1947 हे वर्ष त्याला अपवाद आहे. 16 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले होते.
तुम्हाला माहिती आहे का की, 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही सीमारेषा नव्हती. ती 17 ऑगस्ट रोजी रॅडक्लिफ रेषा म्हणून आखण्यात आली . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 560 संस्थानांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. इतर 2, हैदराबाद आणि जुनागड भारतीय सैन्याने ताब्यात घेतले.
भारतीय स्वातंत्र्याबाबत आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगालने आपल्या घटनेत दुरुस्ती केली आणि गोव्याला पोर्तुगीज राज्य म्हणून घोषित केले. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने गोव्यावर हल्ला केला आणि गोवा भारताचा अविभाज्य भाग बनला.
भारताशिवाय 15 ऑगस्ट हा इतर तीन देशांचाही स्वातंत्र्यदिन आहे. 15 ऑगस्ट 1945 रोजी दक्षिण कोरिया जपानपासून स्वतंत्र झाला. बहरीन 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटनपासून आणि 15 ऑगस्ट 1960 रोजी काँगो फ्रान्सपासून स्वतंत्र झाले.