हाथरस सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत 121 भाविकांचा मृत्यू झाला. भोले बाबाचे प्रवचन ऐकण्यासाठी जवळपास अडीच लाख लोक आले होते. या दुर्घटनेनंतर या बाबासंबंधीची एक एक माहिती समोर येत आहे. या बाबाला नारायण साकार हरी, विश्व हरी, भोले बाबा अशा अनेक नावाने ओळखल्या जाते. कथावाचक सुरजपाल सिंह जाटव यांना पाहिल्यानंतर कोणी त्यांना आध्यात्मिक गुरु असल्याचे म्हणू शकत नाही. पण त्यांचा लाखो भक्त परिवार आहे. या मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यात बाबांचे नाव नाही. तर आयोजकांचे नाव आहे. तरी पण हा बाबा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मुळगावी मोठी जमीन
या बाबाचे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि इतर अनेक राज्यात भक्त आहे. सत्संग कार्यक्रमात लोक त्याच्या दर्शनाला येतात. सुरजपाल सिंह जाटव हे उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील बहादुरनगर गावाचे रहिवाशी आहे. या ठिकाणी बाबाचे मोठे साम्राज्य आहे. पण बाबांचे जन्मगावात कमी येणे जाणे आहे. याठिकाणी बाबाची एक मोठी धर्मादाय संस्था आहे. त्यातंर्गत बाबाच्या नावावर 15 एकर जमीन असल्याचे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे. या ठिकाणी बाबाचा मोठा आश्रम आहे.
राज्यातील इतर भागातही संपत्ती
उत्तर प्रदेशातील अनेक भागात बाबाचे आश्रम आहेत. विशेष म्हणजे बाबा भक्तांकडून एक रुपया पण दानधर्म घेत नाहीत. तरीही बाबांचे मायाजाल मोठे आहे. या आश्रमाला अनेक जमिनींचा आश्रय आहे. बाबांच्या सत्संगाचे कार्यक्रम सुरु असतात. भोले बाबा आग्रा जवळील एका छोट्या घरात राहत असल्याचा दावा करण्यात येतो. त्या घराला मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी संपत्ती ट्रस्टच्या नावे
सुरजपाल सिंह जाटव यांना अपत्य नाही. त्यांनी 24 मे 2023 रोजी त्यांची सर्व संपत्ती नारायण विश्व हरी ट्रस्टच्या नावे केली आहे. भक्तांच्या म्हणण्यानुसार, बाबा भोले त्यांच्या अनुयायांसाठी प्रवचन देतात. शेजारील खुर्चीत त्यांची मामी बसलेली असते. त्या कधी प्रवचन देत नाहीत. या इंटरनेटच्या युगात बाबा सोशल मीडियावर लोकप्रिय नाहीत. बाबांच्या कार्यक्रमात मोबाईलला बंदी आहे. त्यांचा कोणी फोटो काढू शकत नाही. त्यांचा व्हिडिओ पण तयार करु शकत नाही. त्यामुळे इतर महाराजांसारखे त्यांचे प्रवचन युट्यूब वा इतर ठिकाणी फारसे उपलब्ध नाही.