महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील राजकारणात शरद पवार यांची पॉवर अनेकांना माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्या हिटलिस्टवर पवारचं होते. पक्ष फुटीनंतर पवार डगमगले नसले तरी राजकीयदृष्ट्या पक्षाची मोठी हानी झाली हे नाकारुन चालत नाही. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पण एकहाती लढाई लढत आहेत. त्यातच शरद पवार यांनी अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे काल संकेत दिले. या राजकीय बॉम्बने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात कोण कोण राजकीय लढाई लढणार हा खरा प्रश्न आहे.
आताच ही चर्चा का?
सोनिया गांधी या परदेशी नागरीक असल्याच्या मुद्यावरुन शरद पवार यांनी त्यांच्या काँग्रेसमधील साथीदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. त्यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर प्रखर टीका केली. विरोधात निवडणूक लढली. नंतर आघाडी केली. आता काँग्रेसमध्ये थेट विलीन होण्याचा दावा त्यांनी केला नाही. तर संकेत दिले आहे. व्यवहारिकदृष्ट्या त्यात चूक काही वाटत नाही. सध्याची परिस्थिती पाहता आणि मोदीविरोधातील खेम्यात एकजुटीसाठी हा प्रयोग अव्यवहारीक तर वाटत नाही.
काँग्रेसमध्ये होतील विलीन
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांना अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावे लागेल. पराभव त्यांना टप्यात दिसत आहे. त्यामुळे 4 जूनपूर्वी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल असे ते म्हणाले.
अजित पवारांचे सडेतोड उत्तर
तर अजित पवार यांनी काकांचे विधान फारसे काही मनावर घेतले नाही. शरद पवार यांच्यासोबत दीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.
जनता सरकारची आठवण
काल एका वृ्त्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी जनता सरकारची आठवण काढली. सध्याची परिस्थिती अगदी तशीच असल्याचे ते म्हणाले. जनता पक्षाने 1977 साली केंद्रात सत्ता मिळवली होती. हे सरकार निवडणुकीनंतर विविध पक्षांच्या सहकार्याने स्थापित झाले होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या विरोधकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला नाही. जनता पक्षाच्या काळात मोररजी देसाई यांचे नाव निवडणुकीनंतर समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी गोटात UPA-3 ची चर्चा