राजस्थान – राजस्थानमधील (Rajasthan) करौली (Karouli) भागात एक अतिशय विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. सर्पदंश झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र तिथे तरुणाच्या घाबरलेल्या कुटुंबियांनी तिथं त्याच्या अंगावरती झाड फुंक मारायला सुरुवात केली. हा प्रकार डॉक्टरांच्या (Doctor) लक्षात येताचं, त्यांनी या कृत्याबद्दल खडसावलं. संपालेल्या डॉक्टरांनी तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांना आरडाओरड केली. त्याचबरोबर आम्हाला योग्य उपचार करु द्यावे अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे. देशात आजही अशा अनेक घटना घडत आहेत. अनेकदा अशा गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. राजस्थानमध्ये झालेली घटना अतिशय संतापजनक असल्याने त्याची अधिक चर्चा झाली आहे.
त्या तरुणाची गंभीर स्थिती पाहता त्या तरुणाचा इतरत्र हलवण्याची तात्काळ सांगण्यात आले. राजस्थानधील रिझोला बडापुरा येथील ही घटना आहे. तरुणाचं वय पंचवीस आहे. त्याचबरोबर रविवार सकाळी त्याला तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान साप चावला आहे. तो घरी झोपला होता. त्यावेळी त्याला साप चावला आहे. ज्यावेळी त्याला साप चावला त्यादरम्यान तो जोरात ओरडला असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. ज्यावेळी त्यांच्या घरच्यांनी लाईट लावली त्यावेळी त्यांना त्यांच्या अंथरूनातून काळा साप दुसरीकडे जाताना दिसला. हे प्रकरण पाहिल्यानंतर घाबरलेल्या लोकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागामध्ये हलवावे लागले. उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपासून लपून तरुणाच्या कुटुंबीयांनी स्वत:हून त्याच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टर म्हणाले, “आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ अतिदक्षता विभागात पोहोचलो. झाड फुंक करण्याचं काम घरच्याकडून सुरु होतं. आम्ही तात्काळ त्याला थांबवले आणि या कृत्याबद्दल कुटुंबीयांना फटकारले असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.