नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजय आणि हैदराबादच्या स्थानिक निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर राजस्थानमध्ये मात्र भाजपला मोठा झटका बसला आहे. राजस्थानच्या 20 जिल्ह्यातील 90 नागपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. मतदानाची टक्केवारी आणि विजयी उमेदवारांच्या संख्येतही काँग्रेस भाजपच्या खूप पुढे असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या निवडणूक निकालानंतर राजस्थानमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.(Big victory of Congress in local elections in Rajasthan)
‘काँग्रेस पक्षाचे सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन, मतदारांचे आभार, काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांचे त्यांनी घेतलेल्या परिश्रमासाठी धन्यवाद आणि विजयाच्या शुभेच्छा’, असं ट्वीट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं 1 हजार 197 वार्डात विजय मिळवला आहे. तर भाजपला 1 हजार 140 जागांवर विजय मिळाला आहे. निवडणूक निकालात दोन्ही पक्षांमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली.
आज आए 90 नगरीय निकाय के चुनावों के नतीजे सुखद हैं। कांग्रेस पार्टी के सभी विजयी प्रत्याशियों को हार्दिक बधाई और शुभकामनायें। मतदाताओं का आभार तथा कांग्रेस कार्यकर्ताओं व नेताओं को उनकी मेहनत के लिये धन्यवाद और जीत की बधाई। #Rajasthan
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 31, 2021
अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही विजयाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. ‘राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या समस्त काँग्रेस उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन आणि निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद. काँग्रेस उमेदवारांना मोठ्या प्रमाणात समर्थन दिलेल्या मतदारांचेही आभारट, असं ट्वीट सचिन पायलट यांनी केलं आहे.
राज्य में हुए नगर निकाय चुनावों में विजय हासिल करने वाले समस्त कांग्रेस प्रत्याशियों को हार्दिक बधाई एवं चुनावों में कड़ी मेहनत के लिए समस्त कार्यकर्ताओं को धन्यवाद देता हूँ। कांग्रेस उम्मीदवारों को अपार जनसमर्थन देने के लिए समस्त मतदाताओं का आभार | pic.twitter.com/8ieITMf0zM
— Sachin Pilot (@SachinPilot) January 31, 2021
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 90 नगरपालिका निवडणुकीत एकूण 3 हजार 35 वार्डांपैकी 3 हजार 34 वार्डाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात काँग्रेसला 1 हजार 197 तर भाजपला 1 हजार 140 जागांवर विजय मिळाला आहे. तर 634 वार्डात अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. 46 वॉर्डात राष्ट्रवादी काँग्रेस, 13 वॉर्डात आरएलपी, 3 वॉर्डात सीपीआय (एम) आणि एक उमेदवार बहुजन समाज पक्षाचा निवडून आला आहे.
राजस्थानमधील 20 जिल्ह्यांमध्ये त्यात अजमेर, बांसवाड़ा, बीकानेर, भीलवाड़ा, बूंदी, प्रतापगढ़, चित्तौड़गढ़, चूरू, डूंगरपुर, हनुमानगढ़, जैसलमेर, जालौर, झालावाड़, झुंझुनूं, नागौर, पाली, राजसमंद, सीकर, टोंक और उदयपूर मधील 90 नगरपालिका आणि नगपरिषदांसाठी गुरुवारी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 9 हजार 930 उमेदवार रिंगणात होते.
संबंधित बातम्या :
राहुल गांधींना पुन्हा पक्षाध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसकडून प्रस्ताव मंजूर
‘राहुल गांधींची देश तोडण्याची भाषा, पोलिसांप्रती सहानुभूतीचा एक शब्दही नाही’, स्मृती इराणी भडकल्या
Big victory of Congress in local elections in Rajasthan