पाटना: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत. (Bihar assembly election 2020, last day of third phase election campaign)
मुजफ्फरपूर मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी 9 उमेदवार आमने-सामने आहेत. शेवटच्या टप्प्यात सीमांचल या मुस्लीम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचलमधील काही जागांवरही ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे.
शेवटच्या टप्प्यात महाआघाडीतून काँग्रेसचे 25 तर RJDचे 46 उमेदवार रिंगणात आहेत. तर NDA कडून भाजप ३५ जागांवर आणि JDU 37 जागी लढत आहेत. 5 ठिकाणी सीपीआय (माले), तर 2 ठिकाणी सीपीआयने आपले उमेदवार उतरवले आहेत. याचबरोबर VIP 5 तर हम एका जागेवर निवडणूक लढवत आहे. तर MIM च्या असदुद्दीन ओवेसी यांनी जवळपास 2 डझन जागांवर दंड थोपटले आहेत.
विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणूक प्रचारासाठी 3 नोव्हेंबर रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाथी विधानसभा क्षेत्रात गेले होते. यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कांदे फेकले. यावेळी त्या व्यक्तीने भर प्रचारसभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
“बिहारमध्ये बिंधास्तपणे मद्यविक्री होत आहे. तस्करी केली जात आहे. पण तुम्ही काहीच करु शकत नाही”, अशाप्रकारची घोषणाबाजी नितीश कुमार यांच्यावर कांदा फेकणाऱ्या व्यक्तीने केली. यावेळी नितीश कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “फेकू द्या, जेवढं फेकायचं आहे तेवढं फेकू द्या”, असं नितीश कुमार म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु ठेवलं.
RJD नेते आणि नितीश कुमार यांचे विरोधक तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर झालेल्या कांदाफेकीचा निषेध नोंदवला आहे. ‘लोकशाहीमध्ये निषेध नोंदवण्याचे इतर अनेक प्रकार आहेत. मतदानाच्या माध्यमातूनही निषेध नोंदवला जाऊ शकतोय. ही घटना घडायला नको होती. आम्ही मुद्द्यावर लढणारे लोक आहेत. या पद्धतीचे प्रकार मला आवडत नाहीत’, असं तेजस्वी यादव म्हणाले.
आज चुनावी सभा में किसी ने आदरणीय मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार जी की ओर प्याज फेंकी। यह पूर्णत: निंदनीय, अलोकतांत्रिक और अवांछनीय व्यवहार है। लोकतंत्र में प्रतिरोध की अभिव्यक्ति सिर्फ मतदान में होनी चाहिए और इसके अलावा कोई भी तरीका स्वीकार्य नहीं हो सकता।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 3, 2020
बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की
नितीश कुमारांवर भरसभेत कांदाफेक, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर रोष
Bihar assembly election 2020, last day of third phase election campaign