Marathi News National Bihar Politics What Uddhav Thackeray could not do in Maharashtra, Nitish Kumar did in Bihar know the political equation in Bihar
Nitish Kumar : जे उद्धव ठाकरेंना नाही जमलं ते नितीशकुमारांनी करुन दाखवलं, कसं? 10 मुद्यातून समजून घ्या राजकीय समीकरण
नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर लगेच तेजस्वी यादव यांच्यासोबत सत्तास्थापनेची तयारीही सुरु झालीय. त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना जमलं नाही ते बिहारमध्ये नितीश कुमार यांनी करुन दाखवलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नितीश कुमार, उद्धव ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on
पाटना : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना दुभंगली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. महत्वाची बाब म्हणजे शिंदे यांच्या बंडाला भाजपची साथ होती असा आरोप शिवसेना आणि विरोधकांकडून केला जातोय. त्याच भाजपसोबत जनता दल युनायटेडची बिहारमध्ये सत्ता होती. मात्र, आज बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप झालाय. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर लगेच तेजस्वी यादव यांच्यासोबत सत्तास्थापनेची तयारीही सुरु झालीय. त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना जमलं नाही ते बिहारमध्ये नितीश कुमार यांनी करुन दाखवलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती का तोडली? आणि पुन्हा एकदा तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबत ते सत्तेच्या गादीवर बसत आहेत. हे गणित ते नेमकं कसं जुळवणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बिहारमधील राजकीय समीकरण जाणून घेणं गरजेचं आहे.
बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
नितिश कुमार एक असे नेते आहेत ज्यांचा राजकारणात कुणी कायमस्वरुपी मित्र नाही आणि कायमस्वरुपी शत्रूही नाही.
नितीश कुमारला आशा आणि खात्री आहे की भाजपसोबत फारकत घेऊन राजदसोबत जात ते बिहारमध्ये आपलं अस्तित्व कायम करतील
नितीश कुमार आता राष्ट्रीय पातळीवर मोदींना पर्याय म्हणून आपली जुनी ओळख पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील
मात्र, वारंवार यू टर्न 2022 मधील नितीश कुमार यांनी 2013 च्या नितीश कुमारांपेक्षा आपलं महत्वं कमी करुन घेतलं आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळ्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून विरोधकांमध्ये नवी ऊर्जा आणि नवी आशा निर्माण करण्याचं काम केलं.
भाजप आता बिहारमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याच्या आपल्या ध्येयावर जोरदारपणे काम करताना दिसून येईल.
नितीश कुमार यांचा युती तोडण्याचा निर्णय भाजपसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठी डोकेदुखी ठरु शकते. कारण विरोधक आधीपासूनच भाजपवर मित्रपक्षांना संपवण्याचा आरोप करत आहे.
भाजप लालू प्रसाद यादव आणि विरोधकांविरोधात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अधिक आक्रमकपणे हाती घेऊ शकतं.
काँग्रेसकडे बिहार आणि हिंदी भाषिक राज्यात मोजकेच पर्याय आहेत. मात्र, प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करुन काँग्रेस या राज्यात महत्वाची भूमिका बजावू शकते.
महाराष्ट्रात भाजपने ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं, त्यानंतर नितीश कुमार सावध झाले आणि त्यांनी भाजपचाच गेम केला.