अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुतणी सोनल मोदी (Sonal Modi) यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचं तिकीट नाकारल्याचं समोर आलं होतं. यानंतर अहमदाबाद महापालिकेची निवडणूक चर्चेत आली होती. आता अहमदाबादमध्ये भाजपने एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे भाजपमध्ये कार्यरत असणारे स्थानिक मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले आहेत. (BJP did not give ticket o a single Muslim candidate in Ahmedabad Municipal Corporation)
अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं एकाही मुस्लीम व्यक्तीला तिकीट दिलेलं नाही. यामुळे नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी खानपूर येथील पक्षाच्या कार्यालयात विरोध दर्शवला. अहमदाबादच्या गोमतीपूर वार्डमधील 40 वर्षीय फारुख सय्यद यांनी देखील पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
फारुख सय्यद यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना भाजपच्या निर्णयामुळे निराश झाल्याचं सांगितलं. अहमदाबादमधील गोमतीपूर, जमालपूर, मक्तमपुरा या मुस्लीमबहूल भागात तरी मुस्लीम कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी, असं आमचं मत होतं. मात्र, पक्षानं तिकीट दिलं नाही, असं फारुख सय्यद म्हणाले. भाजपनं एकाही मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी न देण्यामध्ये सांप्रदायिकता दिसते, असं सय्यद म्हणाले. काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएमच्या उमेदवारांमध्ये मतविभागणी होऊन फायदा होईल, असा भाजपचा अंदाज असावा, असंही फारुख सय्यद म्हणाले.
भाजपमध्ये काम करणारे सरफराज सांगतात, यावेळी पक्षाला मुस्लीम व्यक्तींना उमेदवारी देण्याची सुवर्ण संधी होती. अहमदाबादच्या 192 जागांवर भाजपनं एकाही मुस्लीम व्यक्तीला संधी दिलेली नाही. जमालपूर सारख्या मुस्लीम बहुल भागात देखील भाजपनं मुस्लीम उमेदवार दिला नाही. जमालपूरमध्ये 95 हजार मतदान आहे. त्यापैकी 80 हजार मतदार मुस्लीम आहेत. आम्हाला भाजपमध्ये प्रतिनिधीत्व मिळेल अशी आशा होती. सरफराज यांनी भाजपकडे 22 जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याची मागणी केली होती.
फारुख सय्यद आणि सरफराज यांनी त्यांची नाराजी अहमदाबादचे प्रभारी आय.के.जडेजा आणि जिल्हाध्यक्ष जगदीश पांचाल यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केलीय. मात्र, पक्षानं उमेदवारांची घोषणा तर केलीय. त्यामुळे मुस्लीम कार्यकर्त्यांना राज्य सरकारच्या महामंडळांवर संधी देण्यात यावी, असं म्हटलंय.
अहमदाबाद भाजपचं जिल्हाध्यक्ष जगदीश पांचाळ म्हणतात की, गुजरात आणि अहमदाबादमध्ये अनेक मुस्लीम कार्यकर्ते आहेत. आम्ही कोणाकडे दुर्लक्ष केलेलं नाही.अहमदाबाच्या मागील निवडणुकीत मुस्लीम कार्यकर्त्यांनी उमेदवारी दिली होती. यावेळी कार्यकर्ते आम्हाला भेटण्यासाठी आले होते ते नाराज नव्हते.
मोदींच्या पुतणीला भाजप तिकीट देणार का? अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा!#GujaratLocalBodyElection2021 #NarendraModiNiece https://t.co/1dYlOwu34v
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या :
मोदींच्या पुतणीला भाजप तिकीट देणार का? अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा!
(BJP did not give ticket o a single Muslim candidate in Ahmedabad Municipal Corporation)