नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय ही चूकच होती, असं काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यावरुन आता भाजपमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ते माफी मागता मागता थकतील पण त्यांच्या चुकांची गणती संपणार नाही, असा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या चुकीची एकप्रकारे कबुलीच दिल्यानंतर आता त्यावरुन जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.(Mukhtar Abbas Naqvi criticizes Rahul Gandhi’s statement on Emergency)
“आणीबाणीत ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या प्रकारे त्यांनी लोकशाहीची हत्या केली. ते माफीच्या लायक आहे का? चुकांच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या गुन्ह्यांचा ढिग दिसेल”, असा घणाघात नक्वी यांनी केलाय. मंगळवारी अमेरिकेतील कॉर्नेल विश्वविद्यापीठातील पाध्यापक आणि भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच मोठं भाष्य केलं आहे.
राहुल गांधी माफी मांगते थक जाएंगे लेकिन उनके गुनाहों की गिनती खत्म नहीं होगी।इमरजेंसी में जिन लोगों ने अपनी जाने गंवाई,जिस तरह से उन्होंने लोकतंत्र की हत्या की..ये माफी करने लायक है? इनकी गुनाहों के गली के हर मोड पर इनके गुनाहों के ढेर दिखेंगे:केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक़वी pic.twitter.com/ndIp1VypvY
— ANI_HindiNews (@AHindinews) March 3, 2021
कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलंय. प्राध्यापक कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ‘आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.
‘संसदेत आम्हाला बोलण्यास परवानगी नाही, न्यायव्यवस्थेकडून आशा नाही, RSS आणि भाजपकडे मोठी आर्थिक ताकद आहे. व्यावसायिकांना विरोधी पक्षांसोबत उभं राहण्यास परवानगी नाही. लोकशाहीवर हा विचारपूर्वक केलेला हल्ला आहे. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुद्दुचेरीत उपराज्यपालांनी अनेक बिल पास होऊ दिले नाहीत. कारण, त्या RSSशी जोडल्या गेलेल्या होत्या. काँग्रेसनं कधीच संस्थानांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. सध्याचं सरकार लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहचवत आहे’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
LIVE: My interaction with Prof Kaushik Basu @Cornell University https://t.co/GfErZtSpW2
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2021
संबंधित बातम्या :
गुजरातमध्ये काँग्रेसला अक्षरश: गाडलं, आप, एमआयएमची टक्कर, वाचा अंतिम निकाल सविस्तर
Mukhtar Abbas Naqvi criticizes Rahul Gandhi’s statement on Emergency