बीड : कुस्ती महासंघाच्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी त्या महिला कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले. त्या प्रकरणावरूनच देशभरातून केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता त्या संताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी आपल्याच पक्षाविरोधात संताप व्यक्त केला असल्याने आता त्यांच्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित केला आहे,
त्याप्रमाणे त्यांनी त्या महिला कुस्तीपटूंच्या समस्या सरकार का ऐकून घेत नाही? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करुन तोडगा काढवा असं मत भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
त्या खेळाडूंच्या आंदोलनाचा आवाज जर सरकारपर्यंत ऐकू जात नसेल तर लोकशाहीसाठी ती चिंतेची बाब आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी असंही म्हटले आहे की, खासदार नसून, मी महिलाही आहे म्हणून त्या महिला कुस्तीपटूंसोबत मी अहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, की, महिला जर या प्रकारची तक्रार नोंदवत असतील तर त्याची तातडीने दखल घेतली गेली पाहिजे.आणि जर या घटनेची अशी दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीसाठी ते घातक असल्याचेही त्यांनी यावेळी बोलन दाखवले आहे.
यावेळी प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, मी फक्त खासदार नसून एक महिलाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मी महिला असल्यामुळेच मला त्या महिला खेळाडूंबद्दल सहानुभूती वाटते आहे असंही त्यांनी भावूकपणे म्हणाल्या आहेत. तसेच इतके दिवस होऊन गेल्यानंतरही संवाद साधला गेला नाही त्यामुळेच आतापर्यंत महिला कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्या महिला कुस्तीपटूंशी सरकारने संवादही साधला नाही ही खूप वाईट गोष्ट असल्याचे सांगत त्यांनी ती खंतही व्यक्त केली आहे.
प्रीतम मुंडे यांच्या हस्ते भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या बीडमधील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही आपल्या मनातील खदखद व्यक्त करुन दाखवली.
यावेळी एक महिला असल्याने महिला कुस्तीपटूंची सुनावणी होत नसल्याची खंत नक्कीच आहे.यावेळी त्यांनी भाजपच्या महाजन संपर्क अभियानाचीही त्यांनी माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जनसंपर्क अभियानाविषयीही आपले मत व्यक्त केले. या मोहिमेद्वारे केंद्राच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.