Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 27, 2021 | 7:50 AM

माझा किंवा माझ्या कुटुंबाचा दीप सिद्धूसोबत कोणताही संबंध नाही, असं भाजप खासदार सनी देओल यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. (Sunny Deol Deep Sidhu)

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर
Follow us on

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्ली हादरुन गेली आहे. भाजपचे गुरदासपूरमधील खासदार आणि अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांनीही दिल्लीतील हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेता दीप सिंह सिद्धूसोबत (Deep Sidhu) आपला कोणताही संबंध नसल्याचं सनीने स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी फडकवलेल्या किसान युनियनच्या झेंड्याबद्दल आणि उफाळलेल्या हिंसेबद्दल दीप सिंह सिद्धूला जबाबदार ठरवले जात आहे. दीपचं नावं समोर आल्यानंतर नेटिझन्सनी सनी देओल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (BJP MP Sunny Deol clarification on BJP connection with Deep Sidhu in Farmer Protest)

सनी देओल यांची फेसबुक पोस्ट

सनी देओल यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर 6 डिंसेंबर 2020 ची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर त्यांनी स्पष्ट रुपात लिहिलंय की दीप सिद्धूशी त्यांचा कोणताबी संबंध नाही. सनी देओल यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलंय “आज लाल किल्ल्यावर जे झालं, ते पाहून मन खूप दुःखी झालं आहे. मी आधीही 6 डिसेंबरला फेसबुकवरुन स्पष्ट केलं आहे की माझा किंवा माझ्या परिवाराचा दीप सिद्धूसोबत कोणताही संबंध नाही. जय हिंद.” असंही सनी देओल यांनी लिहिलं आहे.

“हा शेतकरी आणि आमच्या सरकारमधील प्रश्न”

“माझी संपूर्ण जगाला विनंती आहे, की हा शेतकरी आणि आमच्या सरकारमधील प्रश्न आहे. यामध्ये कोणीही पडू नका. दोघंही आपापसात बातचित करुन यावर तोडगा काढतील. मला माहित आहे की अनेक लोकांना यांचा फायदा उचलायचा आहे. आणि त्यांना यात आडकाठी करायची आहे. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांचा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ यामागे दडला आहे” असंही सनी देओल यांनी लिहिलं आहे.

“दीप सिद्धू केवळ निवडणुकांपुरता सोबत“

“दीप सिद्धू, जो निवडणुकांच्या वेळी माझ्या सोबत होता, दीर्घ काळापासून माझ्यासोबत नाही. तो जो काही करत आहे, ते स्वतः करत आहे, स्वतःच्या इच्छेनुसार करत आहे. त्याच्या कुठल्याही कृत्याशी माझा संबंध नाही. मी माझा पक्ष आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहीन. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे. मला खात्री आहे की सरकार त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढेल” असंही सनी देओल यांनी लिहिलं आहे.

आज लाल क़िले पर जो हुआ उसे देख कर मन बहुत दुखी हुआ है, मैं पहले भी 6dec को फेसबुक के माध्यम से यह साफ कर चुका हूँ कि मेरा या मेरे परिवार का दीप सिद्धू के साथ कोई संबंध नही है।
जय हिन्द।

Posted by Sunny Deol on Tuesday, 26 January 2021

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धू, मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 1984 मध्ये झाला होता. तो एक पंजाबी अभिनेता आहे. दीप सिद्धूने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाली. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

सिद्धू अभिनेत्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या टीमने त्यांना स्वतःसोबत सहभागी करुन घेतले. जेणेकरुन तो स्थानिक लोकांना सनी देओल यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करु शकेल.

संबंधित बातम्या :

Delhi Tractor Rally | दिल्लीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप असलेला दिप सिद्धू कोण आहे? त्यानं खरंच भडकावलं?

‘हा तर अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान’, दिल्ली हिंसाचारावर आरएसएसची प्रतिक्रिया

(BJP MP Sunny Deol clarification on BJP connection with Deep Sidhu in Farmer Protest)