विरोधकांच्या पत्राला भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचे चोख उत्तर, देशाला लिहिलेले खुले पत्र, म्हणाले…

| Updated on: Apr 18, 2022 | 1:21 PM

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (BJP president Jagat Prakash Nadda) यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर देशातील नागरिकांना खुले पत्र (Letter) लिहिले आहे. या पत्रात नड्डा यांनी विरोधी पक्षांसह काँग्रेसवर (Congerss) जोरदार निशाणा साधला आहे. देशातील सध्याच्या जातीय तणावावर 13 राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त करताना एक निवेदन जाहिर केलं होतं. त्याला नड्डा यांनी दिले […]

विरोधकांच्या पत्राला भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचे चोख उत्तर, देशाला लिहिलेले खुले पत्र, म्हणाले...
भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (BJP president Jagat Prakash Nadda) यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर देशातील नागरिकांना खुले पत्र (Letter) लिहिले आहे. या पत्रात नड्डा यांनी विरोधी पक्षांसह काँग्रेसवर (Congerss) जोरदार निशाणा साधला आहे. देशातील सध्याच्या जातीय तणावावर 13 राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त करताना एक निवेदन जाहिर केलं होतं. त्याला नड्डा यांनी दिले उत्तर दिलं आहे. त्यांनी यावेळी देशातील जनतेला एक खुले पत्र लिहिलं आहे. त्यात नड्डा म्हणाले की, हे पक्ष व्होट बँकेचे राजकारण करतात. राजस्थानमधील करौली येथील हिंसाचारावर मौन बाळगतात.

साधूंवर गोळीबार

व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे डोळे उघडण्यासाठी चार राज्यांचे निकाल पुरेसे आहेत. देशातील तरुणांना संधी हवी आहे. विकासाला फाळणीचे गृहन नको आहे, असे नड्डा यांनी या पत्रात दिले उत्तर दिलं आहे. 1966 मध्ये इंदिरा गांधी सरकारने गोहत्या बंदीच्या मागणीसाठी संसद भवनाकडे कूच करणाऱ्या साधूंवर गोळीबार केला. 1984 मध्ये राजीव गांधी म्हणाले होते की, जेव्हा एखादे मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी हादरते.

आदिवासींवर अत्याचार

गुजरात, मुरादाबाद, भिवंडी, मेरठ येथील दंगली, काश्मीर खोऱ्यातील हिंदूंवरील हिंसाचार, भागलपूर दंगल ही काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या दंगलींची लांबलचक यादी असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत दलित आणि आदिवासींवर अत्याचार झाले. काँग्रेसने संसदेच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. बंगाल आणि केरळमधील हिंसाचार आणि तेथील भाजप कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचार हे राजकीय पक्ष लोकशाहीकडे कसे पाहतात याची साक्ष देणाऱ्याच घटना असल्याचे यावेळी नड्डा यांनी सांगितले आहे.

विचार करण्याची गोष्ट

तसेच जेपी नड्डा यांनी पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काय ही विचार करण्याची गोष्ट नाही. गेल्या आठ वर्षांत देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल झाला आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासवर पुढे जात आहे. मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की विकासाचे राजकारण करा.

इतर बातम्या :

Video: ‘होय, शरद पवार साहेब खोटं बोलले’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?

‘5 रंगांचा झेंडा एका रंगाचा कसा झाला?’, Shrimant Kokate यांचा Raj Thackeray यांना सवाल

Sangli : द्राक्षाचे तेच बेदाण्याचे, शेतकऱ्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाच, सर्वकाही व्यर्थ